अभिनेत्याच्या आईला गंभीर आजार, कठीण काळ आठवून शेअर केली भावनिक पोस्ट

अभिनेता आईच्या आठवणीने भावूक 

Updated: Feb 25, 2022, 09:48 AM IST
अभिनेत्याच्या आईला गंभीर आजार, कठीण काळ आठवून शेअर केली भावनिक पोस्ट  title=

मुंबई : प्रत्येकाच्या जवळची व्यक्ती म्हणजे त्याची आई. जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरीही आई ही सुरक्षितच असायला हवी हा प्रत्येकाचा हट्ट असतो. पण जेव्हा आईलाच काहीतरी होतं तेव्हा.... 

तेव्हा प्रत्येकाच्या पायाखालची जमीन निसटते... असंच काहीस बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सोबत झालं आहे. 

कार्तिकने मनाला स्पर्श करणारी एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. एका पोस्टमध्ये कार्तिकची आई माला तिवारी कॅन्सरवर मात करणाऱ्या व्यक्तींसोबत दिसत आहे. कार्तिकच्या आईने कॅन्सरसोबत यशस्वी लढा जिंकला आहे. याबाबत त्याने भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 

आईसोबत केला डान्स 

कॅन्सरसंबंधित एका खासगी कार्यक्रमात कार्तिक आपल्या आईसोबत उपस्थित राहिला होता. कार्तिकने सांगितलं की, त्याच्या आईला चार वर्षांपूर्वी ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. 

माला यांनी कॅन्सरवर मात केली आहे. कार्तिकने कार्यक्रमातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये कार्तिकची आई परफॉर्म करताना दिसत आहे. 

कॅन्सरशी लढण्यासाठी आईचा प्रवास सांगताना कार्तिक आर्यन भावूक झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, केमोथेरपी सेशनमध्ये जाण्यापासून ते या गाण्याच्या शूटिंगदरम्यान स्टेजवर डान्स करण्यापर्यंतचा हा प्रवास खूप कठीण आहे.

पण आईची सकारात्मकता, चिकाटी आणि निर्भयपणाने आपल्याला पुढे नेले आहे. आज मी अभिमानाने सांगू शकतो की माझ्या आईने कर्करोगाशी लढा दिला आणि त्यावर विजय मिळवला. मला तुझा खूप अभिमान आहे आई. जे लोक हे युद्ध जिंकू शकले नाहीत आणि ज्यांनी या रोगाविरुद्ध लढण्याचे धैर्य दाखवले त्या सर्व लोकांना मी माझा आदर करतो.