#Tanhaji : पाहा 'माय भवानी'च्या गजरात अजयने नाचवली देवीची पालखी

अजय- अतुलने संगीतबद्ध केलेलं चित्रपटातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला 

Updated: Dec 12, 2019, 02:21 PM IST
#Tanhaji : पाहा 'माय भवानी'च्या गजरात अजयने नाचवली देवीची पालखी  title=
तान्हाजी ; Tanhaji The Unsung Warrior

मुंबई : अजय देवगन  Ajay devgn आणि काजोल यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर'  Tanhaji The Unsung Warrior  या चित्रपटाचा मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमधील ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला. ज्यामागोमाग चित्रपटातील आणखी एक गाणंही आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'माय भवानी' Maay Bhavani से बोल असणाऱ्या या गाण्यातून सुभेदार तान्हाजी मालुसरे आणि त्यांच्या कुटुंबाची झलक पाहायला मिळत आहे. 

होळी, पालखी अशा एकंदर उत्साही वातावरणाची जोड गाण्याला मिळाल्यामुळे ते अधिक प्रत्ययकारीपणे साकारण्यात आल्याचं लक्षात येत आहे. माय भवानी म्हणज देवीची पालखी डोक्यावर घेवून ही पालखी नाचवणारा अजय देवगन म्हणजेच चित्रपटातील 'तान्हाजी' सर्वांचं लक्ष वेधत आहे. 

मराठमोळ्या संस्कृतीतील काही परंपरांची झलक या गाण्यातून पाहायला मिळते. काजोल आणि अजयचा मराठमोळा अंदाजही गाण्याला आमखी उठावदार करत आहे. सोबतच गाण्यामध्ये तान्हाजी मालुसरे यांच्या भावाची भूमिका साकारणारा 'सूर्याजी' म्हणजेच अभिनेता देवदत्त नागेसुद्धा दिसत आहे. 

स्वानंद किरकिरे यांनी हे गीत लिहिलं आहे. अजय-अतुल या लोकप्रिय संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलेल्या या गाण्यात अनेक वाद्यांची जोड दिल्याचं गाणं ऐकताना लक्षात येत आहे. सुखवींदर सिंग आणि श्रेया घोषाल यांनी 'माय भवानी' हे गाणं गायलं आहे. 

वाचा : ....अन् 'तान्हाजी'च्या सेटवर देवदत्तला रडू कोसळलं 

दरम्यान, ओम राऊत दिग्दर्शित 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' हा चित्रपट नव्या वर्षात म्हणजेच, १० जानेवारी २०२०ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील अत्यंत महत्त्वाच्या अशा कोंढाण्याचा थरार या चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे.