‘ठग्स….’साठी काहीपण.... बिग बी, आमिरने उचललं ‘हे’ पाऊल

 आपलं स्वप्न अखेर साकार झाल्याची प्रतिक्रिया आमिर खानने दिली. 

Updated: Sep 26, 2018, 05:51 PM IST
‘ठग्स….’साठी काहीपण.... बिग बी, आमिरने उचललं ‘हे’ पाऊल  title=

मुंबई: अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करण्याचं आपलं स्वप्न अखेर साकार झाल्याची प्रतिक्रिया आमिर खानने दिली. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या निमित्ताने त्याला ही संधी मिळाली आणि त्याने या संधीचं सोनंही केलं. असा हा बहुचर्चित चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बिग बी आणि आमिर खान यांनी अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

दाक्षिणात्य प्रेक्षकांपर्यंतही पोहोचण्यासाठी त्यांनी थेट तामिळ आणि तेलुगू या भाषा शिकत हा चित्रपट या दोन्ही भाषांमध्ये डब होणार असल्याचं सांगितलं आहे.

बिग बी आणि आमिर यांना दाक्षिणात्य भाषा बोलताना पाहणं हे अनेक चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच देणारं ठरलं आहे.

यशराज फिल्म्सतर्फे यासंबंधीचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला, ज्यामध्ये बी- टाऊनच्या या दोन्ही कलाकारांचा आणखी एक पैलू पाहायला मिळत आहे.

विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाचा पोस्टर आणि त्यातील कलाकारांचे लूक काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आले. आता सर्वांचच लक्ष लागून राहिलं आहे ते म्हणजे या चित्रपटाच्या ट्रेलरकडे.

अमिताभ बच्चन, आमिर खान, कतरिना कैफ आणि फातिमा सना शेख अशी तगडी स्टारकास्ट असणारा हा चित्रपट ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.