केरळमधील पूरपरिस्थितीत बॉलिवूड स्टार्सचा मदतीचा हात

 केरळमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने आणि त्यामुळे आलेल्या पूरामुळे सामान्यांची चांगलीच दाणादाण उडाली आहे.

Updated: Aug 17, 2018, 05:25 PM IST
केरळमधील पूरपरिस्थितीत बॉलिवूड स्टार्सचा मदतीचा हात title=

मुंबई : केरळमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने आणि त्यामुळे आलेल्या पूरामुळे सामान्यांची चांगलीच दाणादाण उडाली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनारई विजयन यांनी देखील अधिकाधिक सहयोग देण्याचे आवाहन केले आहे. गेल्या १० दिवसांपासून बरसत असलेल्या पावसामुळे आतापर्यंत सुमारे १६४ जणांचे बळी गेले आहेत. तर जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. 

या पूरपरिस्थितीत बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आपत्ती काळात मदतीसाठी आवश्यक ती माहिती शेअर केली आहे. 

अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, राजकुमार राव, फरहान अख्तर, अनुराग कश्यप, वरुण धवन, श्रद्धा कपूर आणि अनुष्का शर्मा यांसारख्या बॉलिवूड स्टार्सने ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. तसंच शक्य असल्यास मदत करण्याचे आवाहन या स्टार मंडळींनी केले आहे. 

केरळमधील पूरपरिस्थिती अत्यंत गंभीर असून अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटल बिहारी वाजपेयींच्या अंत्यसंस्कारांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळच्या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केरळ दौऱ्यावर जाणार आहेत.