"25 दिवसात सिनेमा, भरमसाठ फी पण...", नाव न घेता Boney Kapoor अक्षय कुमारवर बरसले!

Boney Kapoor Comment on Akshay: अनेकदा बोनी कपूर काहीही बोलणं टाळताना दिसतात. मात्र अलीकडेच त्यांनी अक्षय कुमारबद्दल असं काही बोलले की, त्याचं वक्तव्य व्हायरल होताना दिसतंय.

Updated: Nov 8, 2022, 07:32 PM IST
"25 दिवसात सिनेमा, भरमसाठ फी पण...", नाव न घेता Boney Kapoor अक्षय कुमारवर बरसले! title=
boney kapoor slams akshay kumar

Boney Kapoor on Akshay kumar : मागील वर्ष अभिनेता अक्षय कुमारसाठी काही खास वर्ष राहिलं नाही. अक्षयचे बहुतेक सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर (BOX office) पडल्याचं दिसून आलंय. काही चित्रपट कधी आले याचा पत्ता देखील कोणाला लागला नाही. त्यामुळे अक्षय अनेकदा सोशल मीडियावर (Social Media) ट्रोल होताना दिसतो. अशातच आता दिग्दर्शक बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी अक्षयच्या (Akshay kumar) फ्लॉप चित्रपटांबद्दल मोठं वक्तव्य केलंय.

बोनी कपूर यांनी अक्षयच्या फ्लॉप चित्रपटांबद्दल (Akshay kumar Movie 2022) तसेच भरमसाठ फी घेण्याबद्दल टोमणा मारलाय. बोनी कपूर यांनी एका शोमध्ये हे वक्तव्य केल्यानं सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता बॉलिवूडमध्ये कोणतं प्रकरण शिजतंय? यावर तुफान चर्चा होताना पहायला मिळत आहे.

काय म्हणाले Boney Kapoor ?

आजकाल असे काही कलाकार आहेत जे 25-30 दिवसांत चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करतात आणि भरमसाठ फी घेतात. पण त्याचे चित्रपट हिट होत नाही तर फ्लॉप ठरतात, असं बोनी कपूर म्हणाले आहेत. त्यानंतर बोनी कपूर (Boney Kapoor) यांचा निशाणा कोणावर होता, हे सर्वांना कळून आलं.

आणखी वाचा- धक्कादायक : कॅन्सरवर मात देणाऱ्या अभिनेत्रीची लहान केंसामुळे शोमधून हाकलपट्टी

दरम्यान, बोनी कपूर नुकतेच 'द कपिल शर्मा शो'मध्ये मुलगी जान्हवी कपूरसोबत (Janhvi Kapoor) म्हणून दिसले. जान्हवीच्या 'मिली' चित्रपटाचे (Mili Movie) प्रमोशन करण्यासाठी दोघं तिथं पोहोचले होते. यादरम्यान बोनी कपूर यांनी अक्षय कुमारचे नाव न घेता टीकास्त्र सोडलं. त्यामुळे आता बोनी कपूर यांच्या वक्तव्याची चर्चा होताना दिसत आहे.