'दे दे प्यार दे' सिनेमाची 2 दिवसात मोठी कमाई

चित्रपट अजयच्या विवाह बाह्य संबंधांभोवती फिरताना दिसत आहे.

Updated: May 19, 2019, 03:57 PM IST
'दे दे प्यार दे' सिनेमाची 2 दिवसात मोठी कमाई title=

मुंबई : अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री तब्बू आणि रकूल प्रित यांचा चित्रपट 'दे दे प्यार दे' बॉक्स ऑफिसवर चांगलीच मजल मारताना दिसत आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २३ कोटी रूपयांचा गल्ला जमवला आहे.  चित्रपटाला चाहत्यांकडून आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसात मिळत आहे. चित्रपट अजयच्या विवाह बाह्य संबंधांभोवती फिरताना दिसत आहे. १८ वर्षांपासून आपल्या कुटुंबापासून लांब असलेला ५० वर्षीय श्रीमंत व्यक्ती (अजय देवगण) एका २४ वर्षीय (रकूल प्रित) मुलीच्या प्रेमात पडतो. त्यांच्या नात्यावर आधारलेला हा चित्रपट सध्या चाहत्यांचे मन जिंकत आहे.

ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून चित्रपटाच्या कमाईचा आकडा शेअर केला. चित्रपटाने शुक्रवारी १०.४१ कोटी रूपयांचा गल्ला जमा केला होता. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने १३.३९ कोटी रूपयांची मजल मारली आहे. चित्रपटाने दोन दिवसांत २३.४० कोटींची कमाई केली.

दे दे प्यार दे या चित्रपटाचे दिग्दर्शन आकिब अली यांनी केले आहे. चित्रपटाच्या कथा लव रंजन यांनी लिहिली आहे. अजय 'दे दे प्यार दे' चित्रपटाच्या व्यतिरिक्त 'RRR’, ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’, ‘तुर्रम खान’, ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’या चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे.