Mumbai Saga Box Office : कोरोनातही 'मुंबई सागा' सिनेमाचा एवढा व्यवसाय

कोरोना महामारीनंतर 'मुंबई सागा' सिनेमाने जमवला एवढ्या रूपयांचा गल्ला      

Updated: Mar 25, 2021, 02:09 PM IST
Mumbai Saga Box Office : कोरोनातही 'मुंबई सागा' सिनेमाचा एवढा व्यवसाय title=

मुंबई : कोरोना महामारीनंतर नियमांचं पालन करत सिनेमागृह सुरू करण्यात आले आहेत. कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असली तरीही 'मुंबई सागा' सिनेमाने पहिल्या पाच दिलसांच बॉक्स ऑफिसवर  चांगली मजल मारली आहे. अभिनेता जॉन अब्राहम आणि इम्रान हश्मी स्टारर सिनेमा चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. सिनेमा विश्लेषक तरण आदर्श यांनी सिनेमाने आतापर्यंत किती कोटी कमवले याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 

'मुंबई सागा' सिनेमाने आतापर्यंत ऐवढा गल्ला जमवला...
शुक्रवार        2.82 कोटी
शनिवार         2.40 कोटी
रविवार          3.52 कोटी
सोमवार         1.49 कोटी
मंगळवार        1.47 कोटी
बुधवार           90 कोटी
           

आतापर्यंत सिनेमाने 12.60 कोटी रूपयांचा गल्ला जमवला आहे. सध्या कोरोना रूग्णांची संख्या वाढत असली  तरी सिनेमा प्रेमी मात्र  सिनेमागृहात जावून सिनेमा पाहण्याचा आनंद लूटत आहेत. पण अनेक नियमांचं पालन करत सिनेमागृह सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.