थुकरटवाडीत राणादा-पाठकबाईंचा लगीन सोहळा रंगला

तुझ्यात जीव गुंतला या मालिकेतील घराघरात पोहोचलेली जोडी म्हणजे राणादा आणि अंजली पाठकबाई. या दोघांचे पुन्हा एकदा लग्न लावण्यात आले, ते चला हवा येऊ देच्या थुकरटवाडीत. यावेळी एका गाण्यावर जोरदार धमाल मस्ती धुकरटवाडीत पाहायला मिळाली. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 19, 2017, 10:09 AM IST
थुकरटवाडीत राणादा-पाठकबाईंचा लगीन सोहळा रंगला title=
छाया सौजन्य : झी मराठी युट्यब चॅनेल

मुंबई  : तुझ्यात जीव गुंतला या मालिकेतील घराघरात पोहोचलेली जोडी म्हणजे राणादा आणि अंजली पाठकबाई. या दोघांचे पुन्हा एकदा लग्न लावण्यात आले, ते चला हवा येऊ देच्या थुकरटवाडीत. यावेळी एका गाण्यावर जोरदार धमाल मस्ती धुकरटवाडीत पाहायला मिळाली. ( दिवाळी पाट - थुकरटवाडी, व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्रोल करा)

आपल्या राणा गायकवाड आणि अंजली पाठकबाईंचा लगीन सोहळा पुन्हा एकदा थुकरटवाडीत रंगला. यावेळी गायकवाड कुटुंबीयांनी जोरदार डान्स सादर केला. मात्र, राणादाला काही नाचता येईना. त्यावेळी उपस्थितांनी त्याला नाचायला लावले आणि राणादा असा काही नाचला ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.