बॉलिवूडला संपवण्याचा प्रयत्न केलात तर... मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा 

Updated: Oct 16, 2020, 08:17 AM IST
बॉलिवूडला संपवण्याचा प्रयत्न केलात तर... मुख्यमंत्र्यांचा इशारा  title=

मुंबई : मुंबईतून बॉलिवूडला संपवण्याचे किंवा स्थलांतरीत करण्याचे प्रयत्न खपवून घेणार नसल्याचे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.कोरोना पार्श्वभुमी आणि सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडवर मोठ्या प्रमाणात चिखलफेक करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी नुकतीच मल्टीप्लेक्स आणि सिनेमा थिएटर मालकांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मिटींग घेतली. त्यावेळी ते बोलत होते.  या पार्श्वभुमीवर ते बोलत होते. मुंबई ही केवळ भारताची आर्थिक राजधानीच नव्हे तर सांस्कृतिक राजधानी देखील आहे. बॉलिवूड आणि सिनेमामुळे असंख्य रोजगार निर्माण होत असल्याचेही ते म्हणाले.  काहीजण बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत, हे खूपच चिंताजनक असल्याचे ते म्हणाले.

मुंबईतील बॉलिवूड संपवण्याचे आणि इथून बॉलिवूड स्थलांतरीत करण्याचे शक्य तितके प्रयत्न सुरु आहेत पण हे खपवून घेतले जाणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. बॉलिवुड आपल्या सिनेमांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. हॉलीवूडप्रमाणे इथे छान सिनेमा बनतात. पण गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडला जाणिवपूर्वक बदनाम केले जातय हे वेदनादायी असल्याचे ते म्हणाले. 

कोरोना संकटामुळे देशभरात सिनेमागृह बंद आहेत. पण एटरटेन्मेंट इंडस्ट्रीसाठी गुरुवारचा दिवस खूप स्पेशल राहीला. कारण साधारण सात महिन्यानंतर देशातील थिएटर उघडले गेलेयत. थिएटर्स उघडले असले तरी सिने निर्माते सध्या कोणताही मोठा सिनेमा रिलीज करु इच्छित नाहीत.