सुनील ग्रोव्हर - शिल्पा शिंदे यांच्या कॉमेडी कार्यक्रमाचा PROMO रिलीज, तुमचे हसून हसून पोट दुखेल!

गतवर्षी कपिल शर्मा यांच्यासोबत  वाद झाल्यानंतर सुनील ग्रोव्हर कपिल शर्माच्या शोमधून बाहेर पडला होता. छोट्या पडद्यावर सुनील जवळपास एकवर्षाने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याने नव्याने आपला शो सुरु केलाय. त्याच्या नवीन कार्यक्रमाचा प्रोमो रिलीज करण्यात आलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 7, 2018, 09:11 AM IST
सुनील ग्रोव्हर - शिल्पा शिंदे यांच्या कॉमेडी कार्यक्रमाचा PROMO रिलीज, तुमचे हसून हसून पोट दुखेल! title=

मुंबई : गतवर्षी कपिल शर्मा यांच्यासोबत  वाद झाल्यानंतर सुनील ग्रोव्हर कपिल शर्माच्या शोमधून बाहेर पडला होता. छोट्या पडद्यावर सुनील जवळपास एकवर्षाने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याने नव्याने आपला शो सुरु केलाय. त्याच्या नवीन कार्यक्रमाचा प्रोमो रिलीज करण्यात आलाय.

सुनील ग्रोव्हरच्या नव्या कार्यक्रमाचे नाव 'धन धना धन' आहे.  या शोमध्ये सुनीलसोबत शिल्पा शिंदे आणि अन्य कॉमेडी कलाकार दिसणार आहेत. दरम्यान, कपिल शर्माने आपला पहिला कार्यक्रम बंद केल्यानंतर आता आपला नवा शो आणलाय. 'फॅमिली टाइम विथ् कपिल शर्मा' याच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. त्यानंतर त्याचा आधीच्या शोमध्ये असणाऱ्या सुनील ग्रोव्हरने वादानंतर आपला नवा कार्यक्रम आणलाय.

सुनीलने डिझीटल फ्लॅटफॉर्म तायर केलाय. मात्र, त्याचा शो कलर्स चॅनेलवरही शनिवारी आणि रविवारी रात्री ११ वाजता पाहू शकता. त्याच्या प्रोमोचा विचार करता सुनील प्रोफेसर एलबीडबल्यूच्या माध्यमातून भेटीला येत आहे. तो एका क्रिकेट कमिटीचा सदस्य आहे. मात्र, क्रिकेटची त्याला ए बी सी डी येत नाही. त्यामुळे त्याला क्रिकेटबद्दल किती माहिती असेल, याचा अंदाज तुम्ही करु शकता आणि यातून तुमचे मनोरंजन किती होईल, हे लक्षात येईल.