‘दे दे प्यार दे’चित्रपटातील 'चले आना' गाणं प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या आगामी ‘दे दे प्यार दे’ चित्रपटातील नवीन गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे.

Updated: May 2, 2019, 11:02 PM IST
‘दे दे प्यार दे’चित्रपटातील 'चले आना' गाणं प्रदर्शित title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या आगामी ‘दे दे प्यार दे’ चित्रपटातील नवीन गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे. 'चले आना' असं प्रदर्शित करण्यात आलेल्या गाण्याचे नाव आहे. अक्षयचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली कामगिरी दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटात अजय ५० वर्षाचा दाखवण्यात आला असून तो २४ वर्षाच्या मुलीच्या प्रेमात पडला आहे. या दोघांमध्ये तब्बल २६ वर्षांचा फरक आहे. चित्रपटात अजय तब्बू आणि रकुल प्रित मुख्य भूमिका साकारकाना दिसणार आहे.  

चित्रपटात तब्बू अजयच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. रकुल त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आकिब अली यांनी केले आहे. चित्रपटाच्या कथेचे लेखण लव रंजन यांनी केले आहे. ‘दे दे प्यार दे’चित्रपट १७ मेच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात येणार आहे.  

अजयच्या 'केसरी' चित्रपटाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. बॉक्स ऑफिसवर सुद्धा चित्रपटाने चांगलीच मजल मारली. यानंतर अजय ‘दे दे प्यार दे’चित्रपटाच्या व्यतिरिक्त ‘RRR’, ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’, ‘तुर्रम खान’, ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’या चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे.