दुसऱ्या दिवशीही Cannes मध्ये कंगणा दीपिकाचा जलवा...

 बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आणि दीपिका पदुकोण यांनी कान्स फिल्म फेस्टिवल २०१८ मध्ये वर्णी लावली.

Updated: May 12, 2018, 10:57 AM IST
दुसऱ्या दिवशीही Cannes मध्ये कंगणा दीपिकाचा जलवा... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आणि दीपिका पदुकोण कान्स फिल्म फेस्टिवल २०१८ मध्ये लॉरियाल पॅरिसची ब्रॅंड अंबेसेडरच्या नात्याने भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. यावेळेस दोन्ही अभिनेत्रींचा लूक काहीसा अवाक करणारा आहे. दीपिकाने पहिल्या दिवशीही एका स्टाईल गाऊनमध्ये सोहळ्यात चार चाँद लावले तर दुसऱ्या दिवशी पिंक परी बनवू अवतरली. कंगनाच्या ब्लॅक साडीतील रेट्रो लूकनंतर या हटके लूकमध्येही कंगणाची जादू कायम आहे.

दुसऱ्या दिवशी दीपिका गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये तर कंगणा शिमरी सिलव्हर कॅटसूटमध्ये दिसली.

 

#deepikapadukone #kangnaranaut #cannes

A post shared by W I N G E D - M E (@wingedme88) on

दीपिकाचा हा गाऊन आशी स्टूडिओचा आहे. या आऊटफिटवर तिने बोल्ड मेकअप आणि हाय बन घातला होता.

तर कंगणा रानौतने कॅटसूटवर कर्ली हेअर आणि बोल्ड मेकअप करत हटके लूक सादर केला.

 

#cannes2018 #kangnaranaut

A post shared by VISHAL MJ (@mj.vishal) on

 

#kangnaranaut's cat suit is setting the temperature high! #cannes2018

A post shared by Filmfare Middle East (@filmfareme) on

कान्स फेस्टिव्हलमध्ये कंगना रानौत, दीपिका पदुकोण, हुमा कुरेशी, मल्लिका शेरावत यांसारखे सेलिब्रेटी सहभागी झाले होते. तर १२-१३ मे ला अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन १७ व्यांदा कान्सच्या रेड कार्पेटवर अवतरणार आहे. त्यानंतर १४-१५ मे ला सोनम कपूर कान्स सोहळ्यात वर्णी लावणार आहे. आता त्यांची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.