तुम्ही महिन्यात कमवत नाही,तितकं दीपिका दिवसाला कमवते; रणवीरलाही देते टक्कर

बॉलिवूडमध्येचं नाही तर हॉलिवूडमध्ये देखील दीपिकाचं वर्चस्व,  महिन्याची कमाई ऐकून तुम्हालाही बसेल धक्का  

Updated: Mar 31, 2022, 01:03 PM IST
तुम्ही महिन्यात कमवत नाही,तितकं दीपिका दिवसाला कमवते; रणवीरलाही देते टक्कर  title=

मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोणने फक्त बॉलिवूडमध्येचं नाही तर हॉलिवूडमध्ये देखील स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केल आहे. अभिनेय क्षेत्रात अनेक चढ-उतार पाहिल्यानंतर दीपिकाचा आज प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत समावेश होतो. बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींना दीपिकाने मागे टाकलं आहे. आज यशाच्या उच्च शिखरावर असलेली दीपिका पती आणि अभिनेता रणवीर कपूरसोबत रॉयल आयुष्य जगते. 
 
तुम्ही  विचारही नसेल केला एवढे पैसे दीपिका महिन्याला कमवते. सतत  कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारी दीपिका महिन्याला जवळपास 2 कोटी रूपये कमवते. म्हणजे दीपिका वर्षाला 24 कोटी रुपये कमावते. 

मीडिया रिुपोर्टनुसार, 'दीपिकाची एकून संपत्ती जवळपास 225 कोटी आहे. हे आकडे 2021 सालचे आहेत. गेल्या तीन वर्षांत तिच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. 2018 मध्ये दीपिकाची एकूण संपत्ती 124 कोटी रुपयांच्या जवळपास होती अशी माहिती आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दीपिकाची नेटवर्थ 2019 मध्ये 150 कोटी रुपये होती. 2020 मध्ये दीपिकाची एकूण संपत्ती 198 कोटी झाली. पण दीपिकाच्या उत्पन्नात सतत वाढ होत राहिली. 2021 मध्ये दीपिकाची एकूण संपत्ती 225 कोटींवर पोहोचली.

दीपिका पदुकोणकडे अनेक महागड्या कारचं कलेक्शन आहे. दीपिकाकडे ऑडी A8 आहे ज्याची किंमत 1.2 कोटी आहे. याशिवाय दीपिकाकडे रेंज रोव्हर, मर्सिडीज बेंझ, बीएमडब्ल्यू आहे