रस्त्यात झालेल्या गैरवर्तनाला दीपिकाचे सडेतोड उत्तर...

दीपिका पदुकोण बॉलिवूडच्या टॉप हिरोईन्सपैकी एक.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 1, 2018, 08:24 PM IST
रस्त्यात झालेल्या गैरवर्तनाला दीपिकाचे सडेतोड उत्तर... title=

नवी दिल्ली : दीपिका पदुकोण बॉलिवूडच्या टॉप हिरोईन्सपैकी एक. गेल्या काही दिवसांपासून पद्मावतच्या वादावरून ती चर्चेत होती. तिला अनेक वादांना आणि टीकांना सामोरे जावे लागले. मात्र पद्मावतने प्रदर्शनानंतर दमदार प्रदर्शन केले. 

दीपिकाचे सडेतोड उत्तर

एका मुलाखतीत दीपिकाचा दमदारपणाही दिसून आला. फिल्‍मफेयर मॅग्झिनला दिलेल्या मुलाखतीत दीपिका म्हणाली की, "मी आणि माझे कुटुंबिय एकदा रेस्टॉरन्टमधून परतत होतो. तेव्हा मी १४-१५ वर्षांची होते. आम्ही रस्त्यावरून चालत होतो. माझे वडील आणि बहीण पुढे चालत होते तर आई आणि मी मागून चालत होतो. तेव्हा एका माणसाने मला मागून स्पर्श केला. तेव्हा मी गप्प राहु शकत होते आणि काहीच झाले नाही असे दाखवू शकत होते. पण मी तसे केले नाही. मी मागे वळले. त्या माणसाजवळ गेले आणि कॉलर पकडून त्याला भररस्त्यात जोरदार थप्पड मारली. त्या प्रसंगापासून आई-वडीलांनीही समजले की, मी स्वतःची काळजी घेऊ शकते. "

Deepika Padukone, Prakash Padukone,

पद्मावतची कमाई

संजय लीला भन्साळींचा पद्मावत फारच वादग्रस्त ठरला. यात दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहीद कपूर यांच्या प्रमुख भुमिका आहेत. मात्र अनेक समस्यांचा सामना करत पद्मावत प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर त्याने तगडी कमाई केली. आतापर्यंत चित्रपटाने २०१.५० कोटींची कमाई केली आहे. तर परदेशात कमाईचा आकडा १०६.५० कोटी आहे. म्हणजे एकूण ३०८ कोटींची दमदार कमाई चित्रपटाने केली आहे. 

'पद्मावत' विवाद के बाद दीपिका नहीं करेंगी ऐतिहासिक किरदार, करणी सेना पर दिया ये बयान