रणवीरच्या मेहंदीत लिहिलं दीपिकाचं नाव, तुम्ही पाहिलं?

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी जवळपास सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांच्या या नात्याला एका वेगळ्या वळणावर नेलं. 

Updated: Nov 19, 2018, 09:35 AM IST
रणवीरच्या मेहंदीत लिहिलं दीपिकाचं नाव, तुम्ही पाहिलं?  title=

मुंबई : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी जवळपास सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांच्या या नात्याला एका वेगळ्या वळणावर नेलं. अधिकृतपणे नात्याती घोषणा केल्यानंतर हे दोघंही इटलीतील लेक कोमो येथे आयोजित करण्यात आलेल्या विवाहसोहळ्यात लग्नाच्या बेडीत अडकले. 

इटलीतील विवाहसोहळ्यानंतर 'दीप-वीर' भारतात परतले तेव्हा छायाचित्रकार आणि चाहत्यांची त्यांची एक झलक टीपण्यासाठी तोबा गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. विमानतळावरुन निघाल्यानंतर ही जोडी त्यांच्या घराच्या दिशेने रवाना झाली. 

प्रत्येक ठिकणी ते दोघंही चाहत्यांच्या प्रेमाचा मोठ्या मनाने स्वीकार करत होते. हात उंचावून त्यांना अभिवादन करत होते. त्याचवेळी दीपिकाच्या सुरेख नववधू रुपाने सर्वांचीच मनं जिंकली. सोबतच आणखी एका गोष्टीवर अनेकांच्या नजरा खिळल्या. ती म्हणजे रणवीरच्या हातावरील मेहंदी. 

दीपिकाचं नाव त्याच्या हातांवर मेहंदीने लिहिण्यात आल्याचं लगेचच लक्षात येत आहे. तुम्ही या फोटोमध्ये हे पाहूच शकता. 

मुख्य म्हणजे त्याच्या हातावर एक लहानशी पणती (दीप)सुद्धा रेखाटण्यात आली आहे. त्यामुळे हे त्याच्या परिने व्यक्त केलेलं प्रेमच आहे असं म्हणायला हरकतच नाही. 

मेहंदीच्या रंगाप्रमाणेच दीप-वीरच्या प्रेमाचा रंगही दिवसेंदिवस आणखी गडद व्हावा अशीच चाहत्यांची इच्छा आहे. 

इटलीत पार पडलेल्या विवाहसोहळ्यानंतर आता रणवीर-दीपिकाने बंगळुरू आणि मुंबई येथे त्यांच्या मित्रपरिवारासाठी स्वागत सोहळ्याचं आयोजन केलं आहे. 

२१ नोव्हंबरला बंगळुरू येथे, तर २८ नोव्हेंबरला मुंबई येथे हा स्वागतसोहळा पार पडणार आहे. जेथेय संपूर्ण कलाविश्व आणि या दोघांच्याही मित्रमंडळींची उपस्थिती पाहायला मिळणार आहे.