..म्हणून या वर्षी नसणार दिलीप कुमार यांचे बर्थ डे सेलिब्रेशन

दरवर्षी दिलीप कुमारांचा वाढदिवस म्हणजे घरी दिवसभर मित्रमंडळींचा राबता असतो. पण आजच्या दिवशी असे होणार नाही.

Updated: Dec 11, 2017, 09:27 AM IST
 ..म्हणून या वर्षी नसणार दिलीप कुमार यांचे बर्थ डे सेलिब्रेशन  title=

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार हे आज ९५ वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी असली तरी सायरा बानो यांनी ट्विटरद्वारे सर्वांना संदेश दिला आहे. 

'दिलीप कुमार हे वाढदिवानिमित्त त्यांचे भाऊ-बहिण, नातेवाईक आणि जवळच्या मित्रपरिवाराला भेटतील.  दिलीप साहेबांना शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकाचा संदेश पोहोचेल. त्यांच्यातर्फे मी सर्वांची आभारी आहे.' असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

वाढदिवसाची काय तयारी केलीए ? असे मला विचारले जात आहे. ज्यांना माहित नसेल त्यांना सांगू इच्छिते की, यादिवशी फूलांमूळे आमच्या घराला स्वर्गाचे रूप येते. 

डॉक्टरांचा सल्ला 

दरवर्षी दिलीप कुमारांचा वाढदिवस म्हणजे घरी दिवसभर मित्रमंडळींचा राबता असतो. पण आजच्या दिवशी असे होणार नाही.

इन्फेक्शनमूळे डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. 

जर तुम्ही दिलीप कुमार यांचे आत्मचरित्र वाचले असेल त्यांचे हे शब्द नक्की आठवतील.

'माझ्या हाताला एका अनोळखीचा स्पर्श होतो, ज्याला माझे काम आवडते तेव्हा मला मिळणार आनंद पुरस्काराहून मोठा असतो.'