VIDEO : रेमो डिसूझाचं व्हेलेंटाईन स्पेशल 'गावठी' गिफ्ट

रेमो डिसोजाने एका विशेष संगीतमय नजराण्याचे अनावरण केले आहे. हा नजराणा म्हणजे आगामी येणाऱ्या गावठी या चित्रपटातील एक रोमॅन्टिक गाणं  

Updated: Feb 9, 2018, 02:23 PM IST
VIDEO : रेमो डिसूझाचं व्हेलेंटाईन स्पेशल 'गावठी' गिफ्ट title=

मुंबई : जसा व्हॅलेन्टाईन डे जवळ येतो तसे तरूणाईला आकर्षित करण्यासाठी बाजारात अनेक गोष्टी येतात. प्रत्येक व्हॅलेन्टाईन दिवशी काहितरी खास गिफ्ट किंवा नवीन काहितरी करण्याचे मनसुबे आखले जातात. पण, यंदाच्या व्हॅलेन्टाईनला सुप्रसिद्ध नृत्य आणि सिने दिग्दर्शक रेमो डिसोजाने एका विशेष संगीतमय नजराण्याचे अनावरण केले आहे. हा नजराणा म्हणजे आगामी येणाऱ्या गावठी या चित्रपटातील एक रोमॅन्टिक गाणं आहे. 

'दिसू लागलीस तू' हे अश्विन भंडारे यांनी संगीत आणि स्वरबद्ध केलेले प्रेमगीत एका दिमाखदार सोहळ्यात रेमो डिसोजा यांनी व्हॅलेन्टाईन डे स्पेशल गिफ्ट म्हणून तरूणाईला समर्पित केलंय.

या गाण्याचा संगीत प्रकाशन सोहळा मुंबईच्या जे डब्ल्यू मॅरीएट या पंचतारांकीत हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. चित्रपटातील हिरो-हिरॉईन श्रीकांत आणि योगिता हे नवोदित कलाकार सोहळ्यात 'त्या' प्रेमगीतावर बहारदार नृत्य सादर करत असताना रेमो डिसोजा आणि दिग्दर्शक आनंदकुमार यांनीही न राहावल्याने स्टेजवर अचानक एन्ट्री घेतली आणि उपस्थितांनीही त्या स्पेशल डान्सस्टेपवर ताल धरला.