'या' अभिनेत्यामुळे माधुरी दीक्षितला करावं लागलं होतं 'नो प्रेग्नन्सी कॉन्ट्रॅक्ट' साइन; जाणून घ्या किस्सा

माधुरीला इंडस्ट्रीत धकधक गर्लम्हणूनही ओळखलं जातं. आजही माधुरीचे लाखो चाहते आहेत. अनेकदा चर्चेत असलेल्या धकधक गर्लबद्दल आम्ही तुम्हाला एक असा किस्सा सांगणार आहोत जे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

Updated: Feb 25, 2024, 08:22 PM IST
'या' अभिनेत्यामुळे  माधुरी दीक्षितला करावं लागलं होतं 'नो प्रेग्नन्सी कॉन्ट्रॅक्ट' साइन; जाणून घ्या किस्सा title=

मुंबई : अभिनेत्री माधुरी दीक्षित आत्तापर्यंत बॉलिवूडला एकापेक्षा एक सिनेमा दिले आहेत. माधुरीला इंडस्ट्रीत धकधक गर्लम्हणूनही ओळखलं जातं. आजही माधुरीचे लाखो चाहते आहेत. पण काही वर्षांपूर्वी माधुरीची प्रचंड क्रेझ तिच्या चाहत्यांमध्ये होती.आत्तापर्यंत अभिनेत्रीने अनेक हिट सिनेमा दिले आहेत. त्यामुळे त्याच्याशी संबंधित अनेक किस्से सतत चर्चेत असतात. अनेक किस्से तिच्याबद्दल ऐकायलाही मिळतात. आज आम्ही तुम्हाला अभिनेत्रीबद्दल असा एक किस्सा सांगणार आहोत जे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. 

आज अभिनेत्री यशाच्या शिखरावर आहे. नुकताच तिचा पंचक हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. जरी अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल आयुष्यात सध्या सेटल असली तरी एक काळ असा होता की, अभिनेत्रीचं नाव अभिनेता संजय दत्तसोबत जोडलं जात होतं. असं म्हटलं जातं की, अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात ती अभिनेता संजय दत्तच्या प्रेमात पडली होती. या दोघांच्या अफेअर्सच्या जोरदार चर्चाही होत्या. या दोघांच्या चर्चा इतक्या होत्या की, संजय आणि माधुरीच्या अफेअरचा परिणाम अभिनेत्रीच्या अभिनय कारकिर्दीवर होऊ लागला. 
 
जेव्हा अभिनेत्री  'खलनायक' चित्रपटाचे शूटिंग करत होती, तेव्हा सुभाष घई यांनी माधूरीला नो प्रेग्नेंसी क्लॉजवर साइन इन केलं होतं. कारण दिग्दर्शकांना भीती वाटत होती की, हा चित्रपट मध्येच सोडला तर आपले पैसे बुडतील. मात्र, माधुरीने कोणताही आढेवेढे न घेता त्या क्लॉजवर सही केली होती. या सिनेमात माधूरीसोबत संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ दिसले होते. हा सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच हिट झाला होता. असंही म्हटलं जात की, माधूरी आणि संजय दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडाले होते. 

मात्र अचानक या दोघांच्या दुराव्याच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला होता.जेव्हा संजयवर टाडा केस दाखल झाली तेव्हा माधुरी स्वतः अभिनेत्यापासून दुरावली.  यानंतर अभिनेत्रीने डॉ.  श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं. या जोडीला दोन मुलं आहेत. सध्या अभिनेत्री डान्स रिॲलिटी शो 'डान्स दीवाने'मध्ये जजची भूमिका साकारत आहे.बॉलिवूडमधील धक धक गर्ल अशी ओळख असलेली माधुरी दिक्षित तिच्या करियरच्या सर्वोच्च स्थानी होती तेव्हा तिच्या चाहत्यांची संख्या लक्षावधींमध्ये होती.