Farhan Akhtar: पार्टीमध्ये असं काय घडलं? फरहानवर आली तोंड लपवण्याची वेळ, मलायकाच्या बहिणीसोबत...पाहा Video

Farhan Akhtar hides face: अंजली अरोराच्या पार्टीमध्ये असं काय झालं? फरहानने लाजंगाजं लपवलं तोंड, पण Video समोर आलाच....

Updated: Feb 1, 2023, 06:05 PM IST
Farhan Akhtar: पार्टीमध्ये असं काय घडलं? फरहानवर आली तोंड लपवण्याची वेळ, मलायकाच्या बहिणीसोबत...पाहा Video title=
farhan akhtar ,amrita arora

Farhan Akhtar, Amrita Arora: अभिनेत्री अमृता अरोरा (Amrita Arora) ही आता 45 वर्षांची झाली आहे. 31 जानेवारी रोजी तिने आपला जन्मदिवस (Amrita Arora Birthday) साजरा केला. त्याचं अवचित्य साधून करीना कपूर (Kareena Kapoor) पार्टी दिली होती. करिनाने दिलेल्या पार्टीला सेलिब्रिटींची (Bollywood Celebrity) रीघ लागली. मलायका अरोरा (Malaika Arora), अर्जुन कपूर यांच्यासह अनेक कलाकारांनी अमृताला शुभेच्छा दिल्या. या पार्टीनंतरचा एक व्हिडिओ (Party Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होताना दिसत आहे. (farhan akhtar and amrita arora hides her face while leaving party watch video latest marathi news)

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि अंजली अरोरा (Amrita Arora) तोंड लपवून जात असल्याचं पहायला मिळतंय. फरहान अख्तरदेखील शिवानी दांडेकरसोबत (Shivani Dandekar) पार्टीला हजर होता. मात्र, पार्टीमधून बाहेर पडताना फरहानने आपल्या जॅकेटचा वापर करून तोंड लपवलं. त्यावेळी अंजली अरोरा देखील फरहानसोबत दिसली. त्यांचा हा व्हिडिओ (Amrita Arora Birthday Party Video) सध्या नेटकऱ्यांनी उचलून धरला आहे.

आणखी वाचा - राकेश बापटसोबत ब्रेकअपनंतर Shamita Shetty आमिरसोबत रिलेशनशिपमध्ये? अभिनेत्रीचा मोठा खुलासा

फोटोग्राफर्सपासून फरहानने चेहरा (farhan akhtar hides face) का लपवला?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय. त्याचं कारण समोर न आल्याने फरहान आणि अंजलीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. बहिणीच्या पार्टीसाठी आलेल्या मलायकाला देखील ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. उर्फीच्या (Uorfi Javed) कपड्यांसह तिची तुलना केली जातेय. त्यामुळे आता सोशल मीडियावर एकच चर्चा होताना दिसते.

पाहा Video - 

दरम्यान, अमृता अरोराच्या बर्थडे (Amrita Arora) पार्टीत एपी डिलनच्या उपस्थितीने आकर्षण वाढवल्याचं बोललं जातंय. पार्टी एकदम झकास आणि ग्रँड झाली, ज्यामध्ये करीना आणि सैफ अली खान व्यतिरिक्त, करिश्मा कपूर, मल्लिका भट्ट, रितेश सिधवानी, अमृताचा पती शकील लडक, शिबानी दांडेकर यांनी हजेरी लावली होती. मात्र, चर्चा मात्र फरहानची होताना दिसतेय.