Shah Rukh Khan ची पत्नी गौरी खानविरोधात FIR दाखल! काय आहे प्रकरण?

आर्यन खानचं प्रकरण संपल्यानंतर Shah Rukh Khan ची पत्नी गौरी खान अडचणीत... आता गौरी खानविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गौरी खाननं असं काय केलं की तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली? 

Updated: Mar 2, 2023, 10:44 AM IST
Shah Rukh Khan ची पत्नी गौरी खानविरोधात FIR दाखल! काय आहे प्रकरण? title=

FIR Against Shahrukh Khan's Wife Gauri Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि त्याचं कुटुंब हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता किंग खानच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. शाहरुखची पत्नी गौरी खान (Gauri Khan) विरोधात लखनौमध्ये तक्रार दाखल करण्यात आला आहे. मुंबईत राहणाऱ्या एका व्यक्तीनं सुशांत गोल्फ सिटी कोतवाली येथे हा गुन्हा दाखल केला आहे. या व्यक्तीचे नाव किरीट जसवंत शाह असे असून त्यांनी दावा केला आहे की त्यांनी लखनौच्या तुलसियानी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स लिमिटेडमध्ये फ्लॅट खरेदी केला होता. या फ्लॅटची किंम कोटींच्या घरात असल्याचे त्यांनी सांगितले. आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न असेल की मग त्या व्यक्तीनं गौरी खानविरोधत तक्रार दाखल का केला आहे? 

किरीट जसवंत शाह यांनी गौरीविरोधात तक्रार दाखल करण्याचे कारण म्हणजे ती तुलसियानी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स लिमिटेडची ब्रॅंड अॅम्बेसेडर आहे. या व्यक्तीनं गौरी खानसोबत आणखी तीन लोकांवर हा गुन्हा दाखल केला आहे. किरीट जसवंत शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2014 साली गौरी खानही तुलसियानी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स लिमिटेडची ब्रॅंड अॅम्बेसेडर होती. यावेळी जाहिरात करत असताना गौरीनं सुशांत गोल्फ सिटी कोतवाली येथे फ्लॅट होणार असल्याची माहिती दिली होती. गौरी खानविरोधात कलम 409 अंतर्गत हा तक्रार दाखल करण्यात आला आहे.  गौरी ही एक लोकप्रिय इन्टेरिअर डिझायनर आहे. तिचं 'गौरी खान डिझाईन्स' नावाची स्वतःची एक कंपनी आहे. (FIR Against Gauri Khan) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : धक्कादायक! मी होते शेतात... तितक्यात त्यानं शूट केला व्हिडीओ; Yami Gautam नं शेअर केला 'तो' अनुभव

काय आहे संपूर्ण प्रकरण? 

किरीट जसवंत शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2014 साली जेव्हा गौरीला या फ्लॅटची जाहिरात करताना पाहिले त्यानंतर त्यांनी सुशांत गोल्फ सिटीतील कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन फ्लॅट बूक केला. त्यावेळी त्यांची भेट ही तुलसियानी या ग्रुपचे चिफ डिरेक्टर अनिल कुमार तुलसियानी आणि डिरेक्टर महेश तुलसियानी यांची भेट घेतली. दोघांनी फ्लॅटची किंमत 86 लाख असल्याचे सांगितली. 2016 मध्ये फ्लॅटचा ताबा मिळेल असे आश्वासन दिले. किरीट यांनी त्यांना ज्या अकाऊंटवर पैसे पाठवण्यास सांगितले होते त्या अकाऊंटवर त्यांनी पैसेही पाठवले. मात्र, त्या गोष्टीला सहा महिने उलटूनही त्यांना ताबा मिळालेला नाही. चौकशी केल्यानंतर किरीट जसवंत शाह यांना कळले की जो फ्लॅट त्यांनी बूक केला होता तो फ्लॅट कंपनीनं कोणत्या दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर केला होता.