धक्कादायक! मी होते शेतात... तितक्यात त्यानं शूट केला व्हिडीओ; Yami Gautam नं शेअर केला 'तो' अनुभव

Yami Gautam नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. यावेळी यामीनं Celebrity Privacy Breach वर आलेला तिचा अनुभव शेअर केला आहे. यामीसोबत हा अनुभव अभिनेत्री आलिया भट्टला देखील आला होता. आलियाचा तिच्या घरातील गॅलरीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावर आलियापासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या.

Updated: Feb 28, 2023, 06:34 PM IST
धक्कादायक! मी होते शेतात... तितक्यात त्यानं शूट केला व्हिडीओ; Yami Gautam नं शेअर केला 'तो' अनुभव title=

Yami Gautam On Celebrity Privacy Breach : बॉलिवूड अभिनेत्रींचे लाखो चाहते आहेत. आपली आवडती अभिनेत्री  कधी आपल्या समोर असली की आपण तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी लगेच धावतो. बऱ्याचवेळा यासगळ्यामुळे अभिनेत्रींना अनेक वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो. बऱ्याचवेळा तर कधी कोणत्या सेलिब्रिटीला शॉपिंग करताना किंवा मग फिरायला आल्याचे पाहिले की आपण तिथे पोहोचतो. अनेकांना कधी वाटतं नाही की आपल्याला जसा एकांत आवडतो तसा त्यांना ही आवडत असेल. त्याचं उदाहरण बघायचे झाले तर ज्या प्रकारे अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) तिच्या गॅलरीतील फोटो व्हायरल झाला होता. अशा प्रकारच्या अनेक घटणा या होताना आपण पाहतो. असाच काहीसा अनूभव अभिनेत्री यामी गौतमला (Yami Gautam) आला होता. यामी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती कुठेही दिसली तरी तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी लोक पुढे येतात. तिला चाहत्यांमुळे आलेला एक वाईट प्रसंगाचा खुलासा यामीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. 

यामीनं या मुलाखतीत सेलिब्रिटींची प्रायव्हसी ब्रीच करण्यावर वक्तव्य केलं आहे. यावेळी यामी तिला आलेला अनुभव शेअर करत म्हणाली की मी माझ्या गावी माझ्या शेतात होती. त्यावेळी एक 19-20 वर्षांचा मुलगा तिथे आला आणि तो माझ्या टीमला फोटो काढण्यासाठी रिक्वेस्ट केली. मात्र, त्या मुलानं फोटो काढण्याच्या जागी माझा व्हिडीओ काढला. इतकंच काय तर त्या मुलानं तो व्हिडीओ त्याच्या व्लॉग मध्ये टाकला. त्या व्लॉगला मिलियनमध्ये व्ह्यूज आले.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यामी गौतम पुढे म्हणाली की या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी त्याला म्हणाले की तू अजून असे व्हिडीओ शेअर करत जा. पण प्रत्येक गोष्टीला एक लिमिट आहे आणि अशा गोष्टी करणं चुकीचं आहे. दरम्यान, यामीला आणखी एकदा अशा गोष्टीचा सामना करावा लागला होता. जेव्हा यामीच्या आजीचं निधन झाले होते, त्यानंतर ती तिच्या काकांना भेटायले गेली होती. त्यावेळी तिथे पापाराझी येतील याची अपेक्षा यामीला नव्हती अशा परिस्थितीत यामीला त्या लोकांनी पोझ देखील देण्यास सांगितले. त्यांचे काम पाहता यामीची इच्छा नसताना तिथे पोज दिली.  

हेही वाचा : Urfi Javed च्या ड्रेसचे नाव शीला की जवानी? ऐकून Katrina ही मारेल कपाळावर हात

दरम्यान, यामी सगळ्यात शेवटी लॉस्ट चित्रपटात दिसली होती. या शिवाय यामी लवकरच 'ओह माय गॉड 2' (Ohh My God 2) आणि 'चोर निकल के भागा' (Chor Nikal Bhaga) या दोन चित्रपटांमध्ये दिसणार आहे.