पाहा मोदींच्या भूमिकेतील विवेक ओबेरॉयची बहुविध रुपं

बायोपिकमध्ये विवेक ओबेरॉय साकारत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची व्यक्तीरेखा   

Updated: Mar 18, 2019, 12:02 PM IST
पाहा मोदींच्या भूमिकेतील विवेक ओबेरॉयची बहुविध रुपं  title=

मुंबई : देशाच्या राजकीय पटलावर आगामी लोकसभा निवडणूकांची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे कलाविश्वातही राजकारणाचेच वारे वाहत आहेत, असं म्हणायला हरकत नाही. याला कारण ठरत आहे, एक चित्रपट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनप्रवास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सध्या लगबग सुरू आहे ती म्हणजे त्याचा बायोपिक साकारण्याची. या बायोपिकमध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत झळकणार असून, नुकतंच चित्रपटातील विवेकच्या नव्या लूकवरुन पडदा उचलण्यात आला आहे. 

संन्यासी, तरुण, मध्यमवयीन व्यक्ती अशा विविध रुपांमध्ये तो पाहायला मिळत आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून विवेकचे नऊ वेगवेगळे लूक शेअर केले. आदर्श यांनी शेअर केलेला हा फोटो आणि त्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रुपातील विवेकला पाहताना आता कलाविश्वात या बायोपिकच्या अनेक चर्चानी जोर धरला आहे. 

ओमंग कुमार दिग्दर्शित या चित्रपटातून मोदींच्या राजकीय कारकिर्दीसोबतच त्यांच्या जीवनातील काही खास प्रसंगांवरही भाष्य करण्यात येणार आहे. त्यामुळे आता हा चित्रपट नेमका प्रेक्षकांच्या मनावर आणि बॉक्स ऑफिसवर राज्य करतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. १२ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात अभिनेता मजोज जोशी हे अमित शाहंच्या भूमिकेत दिसती. त्यांच्याव्यतिरिक्त दर्शन कुमार, बोमन इराणी, प्रशांत नारायणन, झरीना वाहाब, बरखा बिश्त सेनगुप्ता, अंजन श्रीवास्तव, यतीन कार्येकर, राजेंद्र गुप्ता आणि अक्षत आर. सलूजा हे कलाकार दिसणार आहेत.