शुक्र है शुक्रवार है... पाहा कोणते चित्रपट झाले रिलीज...

 या  वीकेंडला बॉक्स ऑफिसवर दोन हिंदी, दोन मराठी तर एक इंग्लिश सिनेमा प्रदर्शित झालाये..हिंदीत श्रीदेवीचा मच अवेटेड 'मॉम' हा थ्रिलर सिनेमा प्रदर्शित झालाये..

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 7, 2017, 06:48 PM IST
शुक्र है शुक्रवार है... पाहा कोणते चित्रपट झाले रिलीज... title=

मुंबई :  या  वीकेंडला बॉक्स ऑफिसवर दोन हिंदी, दोन मराठी तर एक इंग्लिश सिनेमा प्रदर्शित झालाये..हिंदीत श्रीदेवीचा मच अवेटेड 'मॉम' हा थ्रिलर सिनेमा प्रदर्शित झालाये..

श्रीदेवीचा हा 300वा सिनेमा असणार आहे..सिनेमात नवाझुद्दीन सिद्दीकी आणि अक्षय खन्नाचीही प्रमुख भूमिका असल्यामुळे या सिनेमाकडून सगळ्यांनाचं प्रचंड अपेक्षा आहेत..

याबरोबरचं परेश रावलची प्रमुख भूमिका असलेला 'गेस्ट इन लंडन' हा सिनेमाही आज प्रदर्शित झालाये..मराठीत हृदयांतर आणि कंडिशन अप्लाय हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले आहेत..

तर हॉलिवूडचा स्पाडरमॅन होमकमिंग हा सिनेमा प्रदर्शित झालाये..या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमाला टायगर श्रॉफने आवाज दिलाये..

त्यामुळे यापैकी कोणता सिनेमा बॉक्स ऑफिसवर बाजी मारतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे....