Salman Khan: सलमान खानची सुपारी 'भाई'जानकडे, तीन वेळा कट फसला पण...; धक्कादायक माहिती समोर!

Gangster  Lawrence Bishnoi brother Anmol: ख्यातनाम बॉलिवूड सिनेस्टार सलमान खानच्या (Salman Khan) जीवाला धोका असल्यानं त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचं समजतंय.

Updated: Aug 20, 2023, 07:20 PM IST
Salman Khan: सलमान खानची सुपारी 'भाई'जानकडे, तीन वेळा कट फसला पण...; धक्कादायक माहिती समोर! title=
Lawrence Bishnoi, Salman Khan

Salman Khan Vs Anmol Bishnoi : बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan)  सुरक्षेबाबत सर्व खबरदारी घेतली जात आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर अभिनेत्याची सुरक्षा वाढवण्यात आली होती. तो कुठेही गेला तरी त्याच्या सोबत सुरक्षा कर्मचाऱ्यांची टीम असते. आता याप्रकरणी स्पेशल सेलच्या सूत्रांनी मोठा दावा केला आहे. त्यामुळे आता सलमानची सुरक्षा आणखी वाढवली जाण्याची शक्यता आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला मारण्याची सुपारी त्याचा भाऊ आणि सहकारी गँगस्टर अनमोल बिश्नोईला दिली आहे. सूत्रांनी एक धक्कादायक दावा केला आहे की, लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला मारण्यासाठी तीन वेळा योजना आखली होती, परंतु प्रत्येक प्रयत्न अयशस्वी झाला. सलमान खानला मारण्यासाठी बिश्नोईने आखलेल्या या तीन ऑपरेशन्सचे नेतृत्व गुंड संपत नेहरा, दीपक आणि टिनू करत होते.

नेहरा, दीपक आणि टिनू हे तिघंही आपल्या मिशनमध्ये अपयशी ठरल्याने लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानच्या हत्येचं काम दुसऱ्या कोणाकडं सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑपरेशन करण्यासाठी त्यांनी भाऊ अनमोलची निवड केली. लॉरेन्सच्या टोळीने तुर्की बनावटीच्या झिगाना पिस्तुलांऐवजी जर्मनी बनावटीच्या पीएस 30 पिस्तुलांचा वापर सुरू केल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता सलमानच्या सुरक्षेत वाढ केल्याचं समोर आलंय.

आणखी वाचा - Salman Khan ला कसला धोका? लॉरेन्स बिश्नोई गँग का उठलीय जीवावर... जाणून घ्या Inside Story

दिल्ली पोलिसांनी अनमोल बिश्नोई विरुद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे, ज्यावरून समजतंय की, या टोळीला लंडनस्थित गुन्हेगाराचा देखील पाठिंबा आहे. अक्षय बिश्नोई याला त्याच्या टोळीत सामील करून घेतल्याने अनमोल बिश्नोईला जोश वाढला होता. त्यामुळे, अलीकडेच त्याला राजस्थानमधील हनुमानगड पोलिसांनी पकडलं. येत्या आठवडाभरात खंडणी प्रकरणी दिल्ली गुन्हे शाखाही त्याची चौकशी करणार आहे.

कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?

लॉरेन्स बिश्नोई हा कुख्यात गँगस्टर (Gangstar) असून सध्या तो तिहार जेलमध्ये बंद आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या नावावर अनेक गुन्हे दाखल आहेत. इतकंच नाही तर तो तुरुंगातून आपली गँग चालवतोय. तुरुंगाबाहेर ही गँग सध्या गोल्डी बराड आणि त्याचा मामेभाऊ सचिन बिश्नोई चालवतायत. हे दोघंही सध्या कॅनडात लपलेत. याशिवाय ऑस्ट्रीयामधून अनमोल आणि कॅनडातून विक्रम बराड आर्थिक देवाण-घेवाणाची कामं सांभाळतात.

दरम्यान, 1998 मध्ये राजस्थानच्या जोधपूरमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खानने काळवीटाची शिकार केली होती. त्यामुळे तो सलमान खानवर नाराज होता. त्यावेळी हे प्रकरण खूप गाजले. बिश्नोई समाजात हरणाची पूजा केली जाते. त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई सलमान खानच्या जीवाचा शत्रू बनला आहे. त्यानंतर त्याने सलमानला संपवण्याची खुलेआम धमकी दिली आहे.