'हेरा फेरी'मध्ये 'बाबू भैया' कडून खायला मागणारी 'ती' क्यूट मुलगी आता दिसते इतकी हॉट!

Phir Hera Pheri Child Artist : 'हेरा फेरी' या चित्रपटात क्यूट मुलीची भूमिका साकारणारी चाइल्ड आर्टिस्ट आता कशी दिसते एकदा पाहाच

दिक्षा पाटील | Updated: Mar 21, 2024, 02:41 PM IST
'हेरा फेरी'मध्ये 'बाबू भैया' कडून खायला मागणारी 'ती' क्यूट मुलगी आता दिसते इतकी हॉट! title=
(Photo Credit : Social Media)

Phir Hera Pheri Child Artist : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांचा 'हेरा फेरी' या चित्रपटाचे आजही चाहते आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा सुरु आहे. पण या चित्रपटात अभिनेत्री बिपाशा बसुच्या भाचीची भूमिका साकारणारी छोटी मुलगी तुम्हाला आठवते का? आता ही मुलगी खूप मोठी झाली आहे. आता तिला पाहून कोणी ओळखू शकणार नाही. चला तर जाणून घेऊया कोण आहे ती मुलगी आणि आता काय करते?

या मुलीचं नाव एंजेलिना इदनानी असं आहे. एंजेलिना आता पूर्ण बदलली आहे. ती दुबईत राहते आणि तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. खरंतर तिनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिला ओळखणं फार कठीण आहे. 'हेरा फेरी' चित्रपटात जी एंजेलिना ही गोड आणि गोंडस दिसत होती आता ती फार वेगळी दिसतेय. खरंतर 'हेरा फेरी' चित्रपटात तिला पाहिल्यानंतर तिला अनेक ऑफर्स मिळू लागल्या होत्या. त्यापैकी एक ऑफर ही 'ता रा रम पम' ची होती. त्यातील तिच्या भूमिकेनं प्रेक्षकांची मने जिंकली होती. एंजेलिना यात ती राणी मुखर्जी आणि सैफ अली खानच्या लेकीची भूमिका साकारली होती. शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी एंजेलिना ही दुबईला शिफ्ट झाली आहे. एंजेलिनालानं सध्या चित्रपटसृष्टीपासून स्वत: ला लांब ठेवलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जेव्हा एंजेलिनानं चित्रपटांमध्ये काम केलं तेव्हा ती 9 वर्षांची होती. आज ती 27 वर्षांची आहे. एंजेलिना ही सोशल मीडियावर असली तरी तिचं अकाऊंट हे प्रायव्हेट आहे. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या फोटोंमध्ये एंजेलिनाचा एक सुंदर लूक पाहायला मिळाला. तिची स्टाइल नेटकऱ्यांनी प्रचंड आवडली. 

हेही वाचा : पुन्हा 'एक दिन का CM'! 23 वर्षानंतर 'नायक'च्या सिक्वेलची चर्चा! मुख्य भूमिकेत अनिल कपूर की...

एंजेलिनानं 'न्यूट्रेला', 'हल्दीराम' सारख्या जाहिरातींमध्ये ही काम केलं आहे. तर तिनं तिच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये फॅशन मार्केटिंगमध्ये डिप्लोमाचं शिक्षण केल्याचं सांगितलं आहे. सध्या ती सिंगापुरमध्ये आहे. तिथे ती Raffles College of Higher Education मधून शिक्षण पूर्ण करत आहे. ती एक कंपनीमध्ये एक मॅनेजर म्हणून काम करते. एंजेलिनानं तिचं सोशल मीडिया अकाऊंट ही प्रायव्हेट ठेवलं असलं तरी तिचे चाहते तिचे फोटो शोधूनचं काढतात.