एक सेल्फी दे दे मुझे!; झुंबड पाहून अभिनेत्री भांबावली

व्हिडिओत मौनीच्या चेहऱ्यांवरचे भावच सांगून जातात की चाहत्यांच्या गराड्यात ती किती गोंधळली होती.

Updated: Aug 29, 2018, 11:58 AM IST
एक सेल्फी दे दे मुझे!; झुंबड पाहून अभिनेत्री भांबावली  title=
छायाचित्र सौजन्य:ट्विटर (Mouni Roy )

मुंबई: अभिनेत्री मौनी रॉय आणि सोशल मीडिया हे जणू समिकरणच. आपल्या चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी ती नेहमीच सोशल मीडियाचा आधार घेते. त्यासाठी सोशल मीडियावरून व्हिडिओ, फोटो, काही पोस्ट ती शेअर करत असते. दरम्यान, अक्षय कुमारसोबत 'गोल्ड' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यामुळे तिची लोकप्रियता आणखीच वाढली आहे. तिच्या या वाढलेल्या लोकप्रियतेचा तिला अंदाज तेव्हा आला, जेव्हा ती चाहत्यांच्या गराड्यात आडकली. व्हिडिओत मौनीच्या चेहऱ्यांवरचे भावच सांगून जातात की चाहत्यांच्या गराड्यात ती किती गोंधळली होती.

सांगितले जात आहे की, हा व्हिडिओ मौनी एका थिएटरमधून बाहेर पडतानाचा आहे. ती जशी थिएटरमधून बाहेर निघते आणि चाहत्यांच्या नजरेला पडते. तोच, चाहते तिला गराडा घालून सेल्फपीची मागणी करतात.पण, ती त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करते. आपण दुर्लक्ष केल्याने चाहते दूर जातील असा तिचा विचार असावा. पण, तसे करतील तर चाहते कसले? त्यांनी चक्क बहुसंख्येने तिला गराडाच घातला. 

दरम्यान, मौनीसोबत कोणीही सुरक्षा रक्षक दिसत नाही. दरम्यान, मौनीची एक जवळची मैत्रीण इशा गुप्ताने तिला सहकार्य केले आणि चाहत्यांच्या गराड्यातून कसेबसे बाहेर काढत आपल्या वाहनात बसले.