हृदयांतर आयुष्य साजरं करण्याचा प्रवास - ऐश्वर्या

दिग्दर्शक विक्रम ​​फडणीस ​आपल्या आगामी चित्रपट ​'हृदयांतर' द्वारे मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहेत. नुकतंच या चित्रपटाचं म्युझिक लॉन्च झालं... तेही बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या हस्ते.

Updated: Jun 13, 2017, 02:11 PM IST
हृदयांतर आयुष्य साजरं करण्याचा प्रवास - ऐश्वर्या title=

मुंबई : दिग्दर्शक विक्रम ​​फडणीस ​आपल्या आगामी चित्रपट ​'हृदयांतर' द्वारे मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहेत. नुकतंच या चित्रपटाचं म्युझिक लॉन्च झालं... तेही बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या हस्ते.

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शिक करण्यात आला होता... ट्रेलर लॉन्चसाठी बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आवर्जुन उपस्थित होता. त्यानंतर आता अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने ह्या चित्रपटाचे संगीत प्रकाशन केलंय. 

फॅशन डिझाइनर विक्रम ​फडणीस आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी याआधीही काही प्रोजेक्टसवर एकत्र काम केलंय. 'हृदयांतर आयुष्य साजरं करण्याचा प्रवास आहे... पण त्याचवेळी मला असं वाटतं की हृदयांतर हा एक सुंदर, संवेदनशील आणि भावनिक चित्रपट आहे. या संगीत अनावरण सोहळ्याचा मी हिस्सा होऊ शकले. ही माझ्यासाठी अभिमानाचीच बाब आहे' असं ऐश्वर्यानं यावेळी म्हटलंय.

हा चित्रपट येत्या ७ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे ​आणि सोनाली खरे मुख्य भूमिका ​आहेत.