सुशांत सिंह राजपूतला कधीही भेटलो नाही - गौरव आर्या

गौरव आर्याची मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशी होणार आहे.

Updated: Aug 30, 2020, 03:09 PM IST
सुशांत सिंह राजपूतला कधीही भेटलो नाही - गौरव आर्या  title=
फोटो सौजन्य : ANI

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अनेक गोष्टी समोर आहेत. ड्रग्सबाबत गौरव आर्यासोबतचं रिया चक्रवर्तीचं व्हॉट्सअप चॅट व्हायरल झाल्यानंतर, आता या प्रकरणात ड्रग्सबाबत काही संबंध आहे याची चौकशी होणार आहे. गौरव आर्याला ईडीकडून समन्स बजावण्यात आल्यानंतर उद्या त्याची मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशी होणार आहे. मात्र त्यापूर्वी गौरव आर्याने सुशांतच्या केसशी माझा काहीही संबंध नसल्याचं सांगितलं आहे.

माझा सुशांत आत्महत्या प्रकरणी काहीही संबंध नाही. मी सुशांत सिंह राजपूतला कधीही भेटलो नाही. 2017 मध्ये रियाला भेटलो असल्याचं गौरव आर्याने गोव्याच्या विमानतळावर बोलताना सांगितलं आहे.  

रिया आणि गौरव आर्याचं ड्रग्सबाबतचं चॅट व्हायरल झाल्यानंतर त्या दिशेने आता तपास सुरु झाला आहे. गोव्यातील हॉटेल व्यावसायिक गौरव आर्याला ईडीकडून समन्स बजावण्यात आला होता. त्यामुळे आता चौकशीसाठई गौरव आर्या मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. सोमवारी 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता गौरव आर्याला मुंबईमधील ईडी ऑफिसमध्ये चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. 

दरम्यान, समोर आलेल्या या व्हॉट्सअप चॅटमध्ये रिया गौरवला एमडी म्हणजेच Methylenedioxymethamphetamine या अतिशय स्ट्राँग ड्रगविषयी विचारताना दिसत आहे. गौरवसोबत २०१७ मध्ये झालेलं रियाचं बोलणं समोर आलं आहे. सलग तिसऱ्या दिवशीही रियाची सीबीआयकडून चौकशी होणार आहे. याआधी झालेल्या चौकशीत सीबीआयकडून विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तर देताना रिया गोंधळून गेल्याची माहिती आहे.