...म्हणून कास्टिंग काऊचवर बॉलिवूड शांत बसते!

कास्टिंग काऊच आणि बॉलिवूड याचे नाते अतूट आहे, हे आपण जाणतोच. 

Updated: Mar 14, 2018, 08:58 AM IST
...म्हणून कास्टिंग काऊचवर बॉलिवूड शांत बसते!

मुंबई : कास्टिंग काऊच आणि बॉलिवूड याचे नाते अतूट आहे, हे आपण जाणतोच. अलिकडे अनेक अभिनेत्रींनी यावर आपले मत मांडले. स्वतःला आलेले अनुभव शेअर केले. तरी अनेकजणी यावर बोलणे टाळतात किंवा स्पष्टपणे स्वतःचे मत मांडत नाहीत. असे का? तर याचे उत्तर चक्क एका बॉलिवूड अभिनेत्रीनेच दिले आहे. कास्टिंग काऊचवर बॉलिवूड शांत का असते हे अभिनेत्री इलियाना डिक्रूज हिने सांगितले.

इलियाना म्हणते की...

बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणते की, कास्टिंग काऊच बोलणाऱ्यांचे करिअरच संपून जाते.जर कोणी असे करत असेल तर त्याच्यावर आरोप करणाऱ्यांची संख्या जास्त असायला हवी. तो आवाजच सांगेल की स्टार्सची एक बाजू अशी ही आहे.

रेड लवकरच प्रदर्शित होणार

इलियानाचा अजय देवगनसोबतचा रेड हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.