'घरात फक्त 3 प्लेट्स, स्वत: केस कापतो...'; बंगला सोडून फ्लॅटमध्ये का राहू लागला इमरान खान?

Imran Khan : इमरान खाननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करण जोहरच्या फ्लॅटमध्ये भाड्यावर गर्लफ्रेंडसोबत लिव्हइवर राहण्यावर वक्तव्य केलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 20, 2024, 11:03 AM IST
'घरात फक्त 3 प्लेट्स, स्वत: केस कापतो...'; बंगला सोडून फ्लॅटमध्ये का राहू लागला इमरान खान? title=
(Photo Credit : Social Media)

Imran Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इमरान खानन हा गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. दरम्यान, आता बातमी समोर आली आहे की इमरान खान हा त्याची गर्लफ्रेंड लेखा वॉशिंगटनसोबत लवकरच करण जोहरच्या फ्लॅटमध्ये भाडेतत्वावर राहायला जाणार आहे. 

इमरान सध्या लेखा वॉशिंगटनला डेट करत आहे. तिच्यासोबत त्यानं लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. इमरान आणि लेखानं वांद्रेत एक फ्लॅट भाड्यावक घेतला आहे. इमराननं पाली हिल स्थित असलेल्या त्याच्या बंगल्यात राहत होता. वांद्रेतील हा फ्लॅट समुद्राच्या समोर आहे. याच बिल्डिंगमध्ये त्याचा मामा म्हणजेच आमिर खाननं एक अपार्टमेंट भाड्यावर खरेदी केला होता. 

लिव्हइनमध्ये राहण्यावर इमरान खानची प्रतिक्रिया...

दरम्यान, या सगळ्यावर फिल्म कम्पॅनियनला दिलेल्या मुलाखतीत इमरान खान याविषयी विचारताच हसला आणि म्हणाली की "त्यानं त्याच्या आजोबांचा वांद्रेतील बंगला सोडला आहे. यासंदर्भात सविस्तर सांगत इमरान म्हणाला, गेल्या पाच वर्षांपासून, खरंतर जेव्हापासून आम्ही विभक्त झालो तेव्हापासून, मी एका ठिकाणी 5 वर्षांपासून राहत आहे. जिथे काहीच नव्हतं म्हणजे जी जागा खाली होती त्याठिकाणी मी राहायला गेलो. मग मी गरज आहे तितक्याच गोष्टी आणू लागलो." इमरान त्याच्या गरजेच्या गोष्टी कोणत्या हे सांगत म्हणाला, 'टिव्ही, सोफा आणि तीन प्लेट्स. त्या घराची साफसफाई तो स्वत: वॅक्युम क्लिनरनं करायचा आणि स्वत: भांडी देखील धुवायचा.'   

पुढे इमारान म्हणाला," हे सगळं तो त्या बाह्य जगातून बाहेर पडण्यासाठी करत होता. ज्या गोष्टी तुम्ही ऐकता त्यावर तुम्ही विश्वास ठेवू लागतात. अशात कोणत्या गोष्टींनी मला आनंद मिळतो, मी या गोष्टीच्या शोधात होतो. या काही वर्षातला मला आलेला तो खूप सुंदर असा अनुभव आहे. मला माझ्या स्वत: च्या खासगी वेळेची म्हणजेच स्पेसची गरज होती. मला सगळ्या गोष्टी स्वत: करायच्या होत्या. हे सगळं यासाठी होतं की 'बाहेरच्या गोष्टींमध्ये न पडता किंवा कोणत्याही मदतीशिवाय मी स्वत: सगळं करु शकतो का?"

पुढे इमरान म्हणाला की "तो स्वत: ब्रेकफास्ट बनवतो, पण दोन्ही वेळचं जेवण हे आईच्या घरुन येतं. तो स्वत: स्वत: चे केस कापतो." 

इमरान खाननं अवनतिका मलिकसोबत 8 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर लग्न केलं. त्याच्या करिअरच्या सुरुवातीला त्यांची लव्ह स्टोरी ही चांगलीच चर्चेत होती. त्यानंतर त्या दोघांनी एकमेकांपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला.