'या' पाच देशात झालेय 'टाइगर जिंदा है' चे शूटिंग!

 'टाइगर जिंदा है' चे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी सांगितले की, या चित्रपटाचे शूटिंग पाच विविध देशात झाले आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 1, 2017, 03:52 PM IST
'या' पाच देशात झालेय 'टाइगर जिंदा है' चे शूटिंग! title=

नवी दिल्ली : 'टाइगर जिंदा है' चे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी सांगितले की, या चित्रपटाचे शूटिंग पाच विविध देशात झाले आहे. प्रत्येक लोकेशन हे कथेसाठी महत्त्वपूर्ण आहे. आस्ट्रिया, ग्रीस, मोरक्को, अबु धाबी आणि भारत या देशात या चित्रपटाचे शूटिंग झाले आहे. २०१२ मध्ये आलेल्या 'एक था टाइगर' या चित्रपटाचा हा सिक्वल आहे. चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ इंटेलीजेंस एजेंट टाइगर आणि जोयाच्या भूमिका साकारत आहेत. त्यात कठीण मिशनसाठी त्यांचा या पाच देशात प्रवास होतो.

Tiger Zinda hai

जफर यांनी सांगितले की, "कथेची गरज असल्याने या चार देशात फिरणे आवश्यक होते. बर्फाच्या पहाडासाठी आॅस्ट्रिया तर घोड्यांवर बसून फाइटिंग सीक्वेंस शूट करण्यासाठी मोरक्कोला जावे लागले.  'स्वाग से करेंगे सबका स्वागत' गीताचे चित्रीकरण करण्यासाठी ग्रीस हा देश उत्तम होता. रेगिस्तान आणि मारामारीचे सीन्स अबु धाबीला शूट करण्यात आले आहे." त्याचबरोबर आम्ही काही दृश्य दिल्लीच्या नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकमध्ये शूट केली असल्याचे जफर यांनी सांगितले. 

Tiger Zinda hai

या चित्रपटासाठी सलमानचे चाहते अतिशय उत्सुक आहेत. गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट चर्चेत आहे. खूप काळानंतर सलमान आणि कतरिना एकत्र झळकणार आहेत.

Tiger Zinda hai

वृत्तानुसार या चित्रपटाचा ट्रेलर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित केला जाईल. ओक्स ऑफिसवर हा चित्रपट उत्तम कामगिरी करेल, अशी आशा आहे. यंदा क्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सलमान खानचा ‘ट्यूबलाइट’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटल्यामुळे ‘टाइगर ज़िंदा है’ रसिकांच्या अपेक्षा आहेत. यशराज फिल्म्सचा हा चित्रपट २२ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.