'त्याच्यासाठी मी रस्त्यावर...', लग्नात बनियानवर आलेला नुपूर ट्रोल होताच आयराचं सणसणीत उत्तर

Ira Khan : पती नुपूर शिखरेला कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना आयरानं दिलं सडेतोड उत्तर

दिक्षा पाटील | Updated: Jan 5, 2024, 04:46 PM IST
'त्याच्यासाठी मी रस्त्यावर...', लग्नात बनियानवर आलेला नुपूर ट्रोल होताच आयराचं सणसणीत उत्तर title=
(Photo Credit : Social Media)

Ira Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान ही 3 जानेवारी रोजी बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्न बंधनात अडकली. नुपूरनं लग्नासाठी परिधान केलेल्या कपड्यांवरून आणि त्याच्या वरातीनं सगळ्यांचे लक्ष वेधले होते. महत्त्वाच म्हणजे ज्या ठिकाणी लग्न होणार होतं तिथे नुपूर जॉगिंग करत पोहोचला आणि त्यासाठी परिधान केलेल्या कपड्यांमुळे त्या ट्रोलिंगचा सामना करण्यात आला. हे पाहता आता आयरानं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. 

खरंतर आयरा आणि नुपुरच्या लग्नातील सगळ्याच गोष्टी चर्चेत होत्या. त्यातही सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे नुपूरनं परिधान केलेले कपडे. नुपूरनं शॉर्ट्स आणि काळ्या रंगाची सॅन्डो परिधान केली होती. इतकंच नाही तर तो लग्नाच्या ठिकाणी जॉगिंग करत पोहोचला होता. त्यानंतर तो स्टेजवर त्याच कपड्यांमध्ये गेला आणि मग त्यानं आणि आयरानं साईन करत लग्न केलं. त्याचे सगळेच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आलं. हे पाहता आयरानं नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. 

Ira Khan slams netizens for trolling her husband nupur Shikhare wearing gymwear for wedding

आयरानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात आयरानं तिचा आणि नुपूरचा स्टेजवरील एक फोटो शेअर केला आहे. तर त्यासोबत तिनं नुपूरचा धावतानाचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत आयरानं कॅप्शन दिलं की 'तो घोड्यावर आला नाही. तो लग्नाच्या ठिकाणी धावत आला आणि मी मध्ये काही क्यूट पोस्टर लावले होते.' दरम्यान, या आधी एका व्हिडीओत आयरा तिच्या लग्न सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांसोबत नुपूरच्या कपड्यांविषयी बोलताना दिसली. त्यात ती म्हणाली की लग्नासाठी त्याला अंघोळ करून तयार होऊन यायचे होते, तर आता तो कपडे बदलून येणार आहे. 

हेही वाचा : 'आईच्या निधनाविषयी फोनवर कळलं आणि मी...', जान्हवी कपूर भावूक

दरम्यान, त्यानंतरचे आयरा आणि नुपूर शिखरे यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. आयरा आणि नुपूर यांचे कुटूंबासोबतचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. आयरा आणि नुपूरच्या लग्नाविषयी बोलायचे झाले तर त्यांच्या हळदीसाठी किरण राव आणि रीना दत्ता यांनी नऊवारी साडी नेसली होती. त्या दोघींचे लूक सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले होते.