नाईट सूटवर 'इतक्या' हजारांची चप्पल! Isha Ambani च्या लूकनं वेधलं लक्ष

Isha Ambani Sandal Price : ईशा अंबानीच्या सॅन्डलनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. तिचा डिनर नाईटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया देत ती किती डाऊन टू अर्थ आहे ते सांगितले आहे. दरम्यान, ईशाच्या सॅन्डलची किंमत ही हजारोंच्या घरात आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 21, 2023, 02:15 PM IST
नाईट सूटवर 'इतक्या' हजारांची चप्पल! Isha Ambani च्या लूकनं वेधलं लक्ष title=
(Photo Credit : Manav Manglani Instagram)

Isha Ambani Sandal Price : अंबानी (Ambani) म्हटलं की त्यांच्या नावासोबत येते ती लक्झरी. त्यांच्या नावातच लक्झरी आहे असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान, त्यांचे फोटो काढण्यासाठी किंवा एक झलक कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पापाराझी नेहमीच त्यांच्या मागेपुढे फिरत असतात. त्यात मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानीच्या तर सगळ्याच गोष्टी नाऱ्या असतात. ईशा अंबानी (Isha Ambani) ही नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहते. ईशा अंबानीचा फॅशन गेम तर टॉप क्लास असतो. तिच्या फॅशनचे लाखो चाहते आहेत. नुकतंच ईशाला तिचा पती आनंद पिरामलसोबत डिनर डेटवर पाहिलं होतं. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

ईशा अंबानी आणि आनंद पिरामल हे मुंबईत एका रेस्टॉरंटमध्ये एका पार्टीसाठी पोहोचले होते. त्यावेळी त्यांना पापाराझींनी स्पॉट केले. त्यांचा व्हिडीओ हा सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की ईशानं खूप सुंदर आणि डिसेन्ट असा नाईट सुट परिधान केला आहे. त्यावर अनेकांनी तिची स्तुती केली आहे. तर दुसरीकडे चर्चा सुरु आहे ती ईशानं घातेल्या चप्पलची. ईशानं काळ्या रंगाची एक साधारण चप्पल परिधान केली आहे असं अनेकांना वाटलं. मात्र, त्या साधारण दिसणाऱ्या चप्पलची किंमत ऐकता नक्कीच तुम्हाला आश्चर्य होईल. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ईशानं घातलेल्या या चप्पलची किंमत ही 54 हजार 172 रुपये आहे. ही Hermès Oran या ब्रॅंडची सॅन्डल आहे. हे सॅन्डल 21 देशांमध्ये वेगवेगळ्या रंगात आणि फिचरमध्ये उपलब्ध आहे. (Isha Ambani's Viral Video)

हेही वाचा : 'हर कुत्ते का दिन आता हैं', Manjiri Oak नं शेअर केलेला 'हा' व्हिडीओ चर्चेत 

ईशाच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिली आहे. ती खूप डाऊन टू अर्थ आहे. त्या पार्टीत आलेले सगळे फॅशनेबल कपडे परिधान करून आले होते तर दुसरीकडे ईशा नाईटसूट परिधान करत आली. दुसरा नेटकरी म्हणाला, ज्या माणसानं गेट पकडला होता, त्या माणसाला ती धन्यवाद म्हणाली, त्यामुळे तिच्यात असलेले चांगले संस्कार दिसत आहेत. तिसरा नेटकरी म्हणाला, हे बघा श्रीमंत लोक.... आणि इथे 20 हजार कमावणाऱ्याला ब्रॅंड दाखवायचं असतं. आणखी एक नेटकरी म्हणाला, ज्या प्रकारे ती त्या सिक्योरीटी गार्डसोबत वागली त्यावरून तिचा स्वभाव दिसत आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, याला साधेपणा बोलतात, कोणत्याही प्रकारचे शोऑफ नाही.