Manjiri Oak's Dog Masacra Video : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओकची (Prasad Oak) पत्नी मंजीरी ओक (Manjiri Oak) ही तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. मंजीरी फक्त सोशल मीडियावर सक्रिय नसते तर सोशल मीडियावर भन्नाट व्हिडीओ देखील शेअर करताना दिसते. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. नुकताच मंजीरी ओकनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मंजीरीनी तिच्या श्वान विषयी काही सांगितलं आहे. हर कुत्ते का दिन आता है म्हणतं तिनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या कॅप्शननं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
मंजीरी ओकनं हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत मंजीरी ओकनं यावेळी एक्सपेक्टेशन्स वर्सेस रिअॅलिटी असा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मंजीरी ओकची श्वान दिसत आहे. इतरांचे श्वान कसे पाण्यात खेळतात आणि पोहतात त्याजागी माझं श्वान कसे पाण्यात खेळतं. हा व्हिडीओ शेअर करत मंजीरी ओकनं 'हर कुत्ते का दिन आता हैं' असं कॅप्शन दिलं आहे. पुढे मस्काराला टॅग करत मंजीरी ओक म्हणाली 'तरी पण love you च गं'. दरम्यान, मंजीरीनं दिलेलं कॅप्शन पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या लक्षात आलं की मंजीरी हा तिच्या श्वानाविषयी बोलत आहे.
या व्हिडीओवर कमेंट करत अभिनेत्री अमृता खानविलकर म्हणाली, डोळे बघ ना. असं म्हणाली आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, व्वा किती गोड आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, ती खूपच गोंडस आहे. तिचे डोळे किती सुंदर दिसत आहेत. आणखी एक नेटकरी म्हणाला, बिचारी.... किती क्यूट आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, मस्काराचा ही स्टाईल आहे नो कॉम्प्रोमाईज. दुसरा नेटकरी म्हणाला, क्यूटी पाय आहे मस्करा. दरम्यान, मंजीरी ओकनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. इतकंच काय तर नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंटवरून हे लक्षात आले की त्यांच्या पसंतीस उतरत आहे.
हेही वाचा : 'आईच्या निधनावर हसणारा पहिला मुलगा पाहिला...', Pamela Chopra मृत्यूनंतर Uday Chopra ट्रोल
आता तुम्हाला प्रश्न असेल की मस्कारा कोण आहे. प्रसाद ओक आणि मंजीरी ओकच्या श्वानाचे नाव मस्कारा आहे. काही दिवसांपूर्वी मंजीरी ओकनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत मस्काराला कसे ते गोव्याला फिरायला घेऊन गेले याविषयी सांगितलं होतं. त्यांचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी मंजीरी आणि प्रसादची स्तुती केली होती.