अफेअरमुळे चर्चेत असलेल्या Jacqueline Fernandez चा इंटिमेट व्हिडीओ Viral

Jacqueline Fernandez चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिली आहे.  

Updated: Feb 14, 2023, 04:50 PM IST
अफेअरमुळे चर्चेत असलेल्या Jacqueline Fernandez चा इंटिमेट व्हिडीओ Viral title=

Jacqueline Fernandez In Men's innerwear Advertisement : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जॅकलीन गेल्या काही दिवसांपासून 200 कोटींच्या फसवणूक प्रकरणात अटकेत असलेला सुकेश चंद्रशेखर (sukesh chandrasekhar) मुळे चर्चेत आहे. या प्रकरणामुळे जॅकलिनला परदेशात जाण्यासाठी देखील न्यायालयाकडून परवानगी घ्यावी लागते. सध्या या प्रकरणी ईडीकडून जॅकलीनची चौकशी सुरु आहे. या सगळ्यात जॅकलीन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या चर्चेचे कारण तिची नवीन जाहिरात आहे. या जाहिरातीमध्ये जॅकलीन टॅबू तोडताना दिसत आहे, जे करण्यास कोणतीही अभिनेत्री टाळते. पुरुषांच्या इनरवेअरच्या जाहिरातीत तुम्ही नेहमीच पुरुष कलाकाराला पाहिले असेल, मात्र यावेळी या जाहिरातीत पुरुष नाही तर एक महिला आहे आणि ती दुसरी-तिसरी कोणी नसून जॅकलिन आहे. (Jacqueline Fernandez Advertisement)

जॅकलिननं तिच्या या नव्या जाहिरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जॅकलीननं पुरुषांच्या इनरवेअरची जाहिरात केली आहे. जॅकलीनला पुरुषांच्या इनरवेअरची जाहिरात करताना पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. पुरुषांच्या इनरवेअरची जाहिरात करणारी जॅकलीन ही भारतातील पहिली महिला अभिनेत्री ठरली आहे. दरम्यान, ही जाहिरात शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या 'डियर जिंदगी' (Dear Zindagi) या चित्रपटाची दिग्दर्शिका गौरी शिंदेनं दिग्दर्शित केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या जाहिरातीत जॅकलीन फर्नांडिसला पुरुषांच्या अंडरवेअर आणि बनियानबद्दल बोलताना पाहून लोक तिला ट्रोल करू लागले आहेत. तर काही नेटकऱ्यांनी गौरी शिंदे आणि जॅकलीनचे हा टॅबू मोडण्यासाठी आभार मानले आहे. दरम्यान, ही जाहिरात शेअर करत जॅकलीन म्हणाली, गौरी शिंदे दिग्दर्शनात काम करण्याचा एक विलक्षणीय अनुभव आहे. साकेत तोडी यांच्या लक्स कोझी या प्रवासाचा भाग बनवल्याबद्दल धन्यवाद! तुमच्या ब्रँडच्या जाहिरातीतून मी खूप प्रेरित झाले आहे. (Jacqueline Fernandez troll)  

हेही वाचा : Photo : Malaika च्या मादक अदांनी चाहते घायाळ

जॅकलीनच्या या जाहिरातीला पाहून अनेकांनी कमेंट करत ट्रोल केले. एक नेटकरी म्हणाला, 'तिला आणि वरुन धवणला एकत्र या जाहिरातीसाठी घ्यायला हवे होते.' दुसरा नेटकरी म्हणाला की 'देवा, मी अश्या जाहिरातीची कधी अपेक्षा केली नव्हती.' दरम्यान, अनेकांनी जॅकलीनचे अनेकांनी कौतुक केले आहे.