अनुषाच्या Ex-Boyfriend नं सांगितलं ब्रेकअपचं खरं कारण! जेसन म्हणाला, 'काही न विचार करता रिलेशनशिपमध्ये...'

Jason Shah On Breakup With Anusha Dandekar : जेसन शाहनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनुषासोबतच्या ब्रेकअपवर वक्तव्य केलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: May 16, 2024, 06:16 PM IST
अनुषाच्या Ex-Boyfriend नं सांगितलं ब्रेकअपचं खरं कारण! जेसन म्हणाला, 'काही न विचार करता रिलेशनशिपमध्ये...' title=
(Photo Credit : Social Media)

Jason Shah On Breakup With Anusha Dandekar : बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' या वेब सीरिज चांगलीच चर्चेत आहे. या सीरिजमधील चांगलीच चर्चा सुरु आहे. या सीरिजमधील कलाकार चांगलेच चर्चेत असतात. या सीरिजमधील अनेक कलाकार हे मुलाखती देत आहेत. त्यासोबत 'हीरामंडी' वेब सीरिजमध्ये धमाल करणारा जेसन शाहनं देखील एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत जेसन शाहनं त्याच्या खासगी आयुष्याविषयी खुलासे केले आहेत. त्यानं यावेळी ज्या गोष्टींचा खुलासा केला त्यानं सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. त्याशिवाय त्यानं त्याच्या खासगी आयुष्यावर देखील वक्तव्य केलं आहे. 

जेसन शाहनं संजय लीला भन्साळीच्या वेब सीरिज 'हीरामंडी'मध्ये त्याच्या अभिनयानं लोकांची मनं जिंकली. जेसन शाह या सीरिजमध्ये ब्रिटिश ऑफिसर 'कार्टराईट' च्या भूमिकेत दिसला. तर जेसननं ईटाइम्सशी बोलताना अनुषा दांडेकरसोबत झालेल्या ब्रेकअप विषयी सांगितलं. जेसन शाह म्हणाला, "या ब्रेकअपनं मला आधी पेक्षा जास्त समजुतदार बनवलं आहे. खरं, सांगू तर मी खूप घाईत निर्णय घेतला होता, कोणत्याही गोष्टीचा विचार न करता मी रिलेशनशिपमध्ये गेलो. आमचं बोलणं होत नव्हतं, ज्यामुळे मिसअंडरस्टॅन्डिंग खूप वाढेल आणि आमचं नात तुटलं." त्यनंतर जेसन शाहला विचारण्यात आलं की "तो आता कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे का?" या प्रश्नावर अभिनेत्यानं उत्तर देत "नो कमेंट" केलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जेसन शाहनं संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शित 'हीरामंडी' या वेब सीरिजमध्ये अप्रतिम भूमिका साकारली आहे. जेसनचे देखील अनेक सीन सोशल मीडियावर व्हायरल झाले. 'हीरामंडी'विषयी बोलायचं झालं तर ही सीरिज 1 मे रोजी प्रदर्शित होणार. 

हेही वाचा : 'तो कपूर आणि नवाब कुटुंबातून...', तैमूरच्या संस्कार आणि शिस्तीवर जयदीप अहलावतने केलं विधान

जेसन आणि अनुषा या दोघांनी मार्च 2017 मध्ये त्यांच्या रिलेशनशिपला अधिकृत केलं. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत त्यांच्या नात्याविषयी खुलासा केला आहे. त्या फोटोत जेनस हा शर्टलेस होता तर त्याच्यासोबत अनुषा पोज देताना दिसली. तर कथितपणे 2021 मध्ये जेसन आणि अनुषाचा ब्रेकअप झाल्याचे म्हटले जाते. त्यांच्या ब्रेकअपची अफवाह तेव्हा सुरु झाली जेव्हा जेसननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्या दोघांचे फोटो डिलीट केले. जेसन शाह हा सध्या 'हीरामंडी'ला मिळत असलेल्या यशाचा आनंद घेत आहे.