'तो कपूर आणि नवाब कुटुंबातून...', तैमूरच्या संस्कार आणि शिस्तीवर जयदीप अहलावतने केलं विधान

Jaideep Ahlawat on Taimur: जयदीप अहलावतनं करीना आणि सैफच्या लाडक्या तैमूरला असलेले संस्कार आणि शिस्तीवर केलं विधान

दिक्षा पाटील | Updated: May 16, 2024, 05:02 PM IST
'तो कपूर आणि नवाब कुटुंबातून...', तैमूरच्या संस्कार आणि शिस्तीवर जयदीप अहलावतने केलं विधान title=
(Photo Credit : Social Media)

Jaideep Ahlawat on Taimur:  बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान (Kareena kapoor and Saif Ali Khan) यांचा लाडका तैमूर नाही नेहमीच चर्चेत असतो. तैमूरला सतत सोशल मीडियावर टार्गेट करण्यात येतं. पापाराझी नेहमीच सोशल मीडियावर तैमूरचे व्हिडीओ शेअर करताना दिसतात. अनेकदा अभिनेता रितेश आणि जिनिलियाच्या मुलांना असलेल्या संस्कारांपुढे तैमूरला संस्कार नाहीत असे अनेकदा सोशल मीडियावर नेटकरी बोलताना आपण पाहतो. त्याचं कारण म्हणून पापाराझींसमोर किंवा पब्लिकली तैमूर हा सैफवर किंवा पापाराझींवर चिडताना दिसतो. पण खरंतर त्याला खूप चांगले संस्कार आहेत असं अभिनेता जयदीप अहलावतनं एका मुलाखतीत तैमूरला असलेल्या संस्कारांविषयी बोलताना सांगितले. 

करीना कपूर खान आणि सैफ अली खान हे एक सेलिब्रिटी कपल आहे. ते दोघेही त्यांच्या मुलांना चांगले संस्कार देतात. जयदीप अहलावकनं मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तैमूरचा एक किस्सा सांगितला आहे. जयदीपनं सांगितलं की तैमूरला असलेले संस्कार आणि त्याला असलेली शिस्त पाहून त्याला खूप आश्चर्य झाले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जयदीप अहलावतनं जाने जान या चित्रपटात करीना कपूरसोबत काम केलं होतं. त्या चित्रपटाच्या सेटवर तैमूर आणि जेह यायचे. जयदीपनं सांगितलं की शूटवर करीना आणि सैफ यांची मुलं देखील यायची. तैमूर उत्साही आणि जिज्ञासू मुलगा आहे. त्याला अनेक प्रश्न असतात की हे काय आहे... यात काय सुरु आहे? तुम्ही कोणती भूमिका साकारत आहात? तुम्हाला कळत नाही की तुम्ही कसं समजवालं? तुम्ही त्याला काय सांगाल? मग सैफनं तैमूरला सांगितलं की 'तुला माहितीये का... हे आईच्या चित्रपटात मेन हीरो आहे?' त्यावर तैमूर म्हणाला, 'ओह, ओके. ऑल द बेस्ट... ऑल द बेस्ट बोलल्यानंतर तो पूर्ण स्टाईलमध्ये, एकदम प्रोफेशनलसारखा गेला.' 

जयदीपनं सांगितलं की सैफ आणि करीना या गोष्टीची काळजी घेततात की तैमूर जेवण वाया घालणार नाही आणि त्याला त्याची किंमत कळेल. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं मुलांना आदर करणं आणि शिष्टाचारविषयी शिकवलं आहे. 

हेही वाचा : Cannes 2024 च्या रेड कार्पेटवर चक्क श्वानाची हजेरी

तैमूरबद्दल पुढे सांगत जयदीप अहलावत म्हणाला की 'तैमूर हा खूप स्मार्ट आणि कॉन्फिडेंट आहे. आता तो कपूर आणि नवाब कुटुंबाचा भाग आहे. त्याच्यात चांगल्या सवयी नसतील तर कोणात असतील. मी पाहिलंय बेबो आणि सैफ सर त्याच्याशी कशा पद्धतीनं बोलतात. ते त्याला सांगतात ही पुस्तक इथून उचून तिथे ठेव. मुलांमध्ये ज्या सवयी लावतात ना त्या सगळ्या सवयी ते लावत आहेत. '