'ज्या पुरुषांच्या छातीवर...', जया बच्चन यांनी लेकीला दिलेला सल्ला, अभिषेक बच्चनने केला खुलासा

‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अभिनेता अभिषेक बच्चन हा त्याची आई जया बच्चन यांनी दिलेल्या एका सल्ल्याबद्दल बोलत आहे. 

Updated: Apr 12, 2024, 07:11 PM IST
'ज्या पुरुषांच्या छातीवर...', जया बच्चन यांनी लेकीला दिलेला सल्ला, अभिषेक बच्चनने केला खुलासा title=

Jaya Bachchan Advice Daughter About Men : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम म्हणून ‘द कपिल शर्मा शो’ला ओळखले जाते. कपिल शर्माने त्याच्या विनोदी अभिनयाच्या जोरावर लाखो प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. या कार्यक्रमात बॉलिवूड आणि मालिकाविश्वातील अनेक कलाकार सहभागी होत असतात. हे कलाकार अनेकदा त्यांच्या कार्यक्रमाचे किंवा चित्रपटांचे प्रमोशन करताना दिसतात. आता ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अभिनेता अभिषेक बच्चन हा त्याची आई जया बच्चन यांनी दिलेल्या एका सल्ल्याबद्दल बोलत आहे. 

‘द कपिल शर्मा शो’ हा कार्यक्रम 2016 पासून 2021 पर्यंत प्रसारित केला जात होता. या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक कलाकार सहभागी झाले आहेत. आता सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 'हाऊसफुल 3' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख आणि जॅकी श्रॉफने कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावल्याचे दिसत आहे. यावेळी कपिल हा उपस्थित असलेल्यांना पुरुषांच्या छातीवरील केसाबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे. 

कपिलच्या प्रश्नावर अभिषेक बच्चनचा खुलासा

"पूर्वी 80 आणि 90 च्या काळातील अभिनेत्यांच्या छातीवर केस असायचे, पण आता नवीन येणाऱ्या अभिनेत्यांच्या छातीवर केस नसतात", असा प्रश्न विचारतो. त्यावर अभिषेक बच्चन हा कपिलला थांबवतो आणि त्याच्या छातीवर भरपूर केस असल्याचे सांगतो. हे ऐकून शोमध्ये उपस्थित सर्व प्रेक्षक हसू लागतात. यानंतर अभिषेक बच्चन हा जया बच्चन यांनी दिलेल्या एका सल्ल्याबद्दल सांगतो. माझी आई जया बच्चन यांनी माझी बहिण श्वेताला एक सल्ला दिला आहे. "ज्या व्यक्तीच्या छातीवर केस नाहीत, त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नकोस", असे जया बच्चन यांनी श्वेताला सांगितले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by (bolly.sis)

यानंतर रितेश देशमुख हा माझ्या छातीवर केस असल्याचे सांगतो. त्यावर अक्षय रितेशची मस्करी करत 'फक्त चार केस आहेत', असे सांगतो. त्यावर रितेश 'विश्वास ठेवण्यासाठी फक्त चार केसही पुरेसे असतात. मी जंगल घेऊन थोडी फिरणार आहे', असे म्हणतो. सध्या कपिल शर्माच्या कार्यक्रमातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत.