PHOTO : शाहरुखची एकेकाळची ही हिरोईन सध्या करतेय शेती

शाहरुखची खास मैत्रिण आणि बीटाऊनची अभिनेत्री जुही चावला गेल्या सात वर्षांपासून शेती करतेय.

Updated: Apr 17, 2018, 09:57 PM IST
PHOTO : शाहरुखची एकेकाळची ही हिरोईन सध्या करतेय शेती title=

मुंबई : बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याच्यासोबत एक - दोन नव्हे तर कित्येत सिनेमांत हिरोईन म्हणून दिसलेली एक हिरोईन शेतीकडे वळलीय. या हिरोईनचं नाव ऐकल्यावर कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही... पण, हे खरं आहे... ही हिरोईन म्हणजे टी 20 लीगमध्ये कोलकाता टीम विकत घेणारी जुही चावला...  

शाहरुखची खास मैत्रिण आणि बीटाऊनची अभिनेत्री जुही चावला गेल्या सात वर्षांपासून शेती करतेय. आपल्या पित्याच्या निधनानंतर आपण शेती करण्याचा निर्णय घेतल्याचं जुहीनं एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं होतं. 

 

How delightful it is to go to the farm. This is from the time we were just sitting before the mangoes were going to be plucked... We were literally sitting under the tree on a bench having a picnic

को Juhi Chawla (@iamjuhichawla) द्वारा साझा की गई पोस्ट

'मी शेतकरी...'

'जेव्हा मी आमिर खानला या विषयावर सत्यमेव जयते या कार्यक्रमात बोलताना ऐकलं... तेव्हा माझे डोळे उघडले. मी घरी केवळ ऑर्गेनिक शेती करते. ठाणे जिल्ह्यातील वाडा मध्येही फार्महाऊसवर मी शेती करते... मी एक शेतकरी आहे' असं जुही म्हणते.

जुहीच्या वडिलांनी वाडामध्ये 20 एकर जमीन खरेदी केली होती... त्यांच्या निधनानंतर ही जमीन आणि शेतीची जबाबदारी आपण स्वीकारल्याचं जुही अभिमानानं सांगते.