स्मशानात जोर जोरात का ओरडायचे कादर खान

काय आहे सत्य 

स्मशानात जोर जोरात का ओरडायचे कादर खान title=

मुंबई : आपल्या अभिनयातून प्रत्येकाला फक्त आनंद देणारा अभिनेता म्हणजे कादर खान. पण कादर खान यांच बालपण मात्र खूप गरिबीत केलं आहे. कादर खान यांची आई  त्यांना शिकण्यासाठी मशिदीमध्ये पाठवत असे. आज जाणून घेऊया कादर खान यांच्या आयुष्याशी निगडीत काही खास गोष्टी.... 

ज्येष्ठ अभिनेता कादर खान यांचा 22 ऑक्टोबर रोजी 81 वा वाढदिवस साजरा करत आहे. कादर खान यांचा जन्म 1935 मध्ये अफगाणिस्तानमधील काबुलमध्ये झाला. कादर खानने आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात 1974 मध्ये रिलीज झालेल्या सगीनामधून झाली होती. 

कादर खान यांचा जन्म अतिशय गरिबीत झाला. कादर खान यांची आई शिकण्यासाठी त्यांना मशिदीमध्ये पाठवायची तर कादर खान मशिदीमधून स्मशानात जात असतं. एवढंच नव्हे तर स्मशानात जाऊन ते जोरात ओरडत असतं. 

कादर खान यांची ही गोष्ट रोटी फेम अभिनेता अशरफ खान यांना सांगितली. ते म्हणाले की, स्मशानात एक मुलगा बसून खूप ओरडत असतो. अशरफ खान यांना त्यांच्या नाटकासाठी अशाच एका मुलाची गरज होती. आणि त्यांनी कादर खान यांना तो रोल दिला. 

यानंतर कादर खान यांनी अनेक नाटकात सहभाग घेतला. एका नाटकात दिलीप कुमार यांची नजर कादर खान यांच्यावर पडली. दिलीप कुमार यांनी त्यांना आपल्या सगीना या सिनेमाकरता साइन केलं. अभिनयाबरोबरच कादर खान यांनी अमिताभ बच्चन यांचा सुहाग, मुकद्दर का सिकंदर आणि अमर अकबर अॅन्थोनी सारख्या सिनेमाचे डायलॉग देखील लिहीले