'लोक अन्नासाठी मरत आहेत..' मात्र काजोलचा व्हीडिओ पाहून फॅन्स संतापले...

ट्रोलर्सच्या जाळ्यात अभिनेत्री काजोल अडकली आहे. 

Updated: Apr 27, 2021, 02:48 PM IST
'लोक अन्नासाठी मरत आहेत..' मात्र काजोलचा व्हीडिओ पाहून फॅन्स संतापले... title=

मुंबई : सेलिब्रिटी असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टींवर चाहत्यांची नजर असते. महत्त्वाचं म्हणजे आता सोशल मीडियाचा  काळ असल्यामुळे तर, कोणतीही गोष्टी काही क्षणांतचं व्हायरल होते. सेलिब्रिटी होण्याचे फायदे तर आहेतचं, मात्र तोटे देखील आहे. अनेक गोष्टींमुळे सोशल मीडियावर कलाकारांना ट्रोल केलं जातं. आता ट्रोलर्सच्या जाळ्यात अभिनेत्री काजोल अडकली आहे. तसं बघायला गेलं तर काजोल सोशल मीडियावर फार काही सक्रिय नसते. पण सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

काजोलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये काजोल हवेत सफरचंद कापताना दिसत आहे. सर्व प्रथम काजोल हवेत सफरचंद फेकते, त्यानंतर ती हवेतचं ते फळ कापताना दिसत आहे. काजोलतं हे कृत्य तिच्या चाहत्यांना मात्र पटलेलं नाही. व्हीडिओमुळे काजोल ट्रोलर्सच्या जाळ्यात अडकली आहे.

ट्रोलर्स म्हणाले, 'असं अन्न वाया घालवू नको, लोक अन्नासाठी मरत आहेत. ' सध्या परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कोरोना महामारीमुळे सर्वांचं मोठं नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत काजोलने हा व्हीडिओ पोस्ट केल्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.