ड्रायव्हिंग येत नाही म्हणणाऱ्या kangana Ranaut च्या कारला तीनवेळा अपघात

ड्रायव्हिंग येत नसणाऱ्या कंगनाच्या गाडीसा तीनवेळा अपघात... खुद्द अभिनेत्री म्हणाली...   

Updated: May 27, 2022, 09:17 AM IST
ड्रायव्हिंग येत नाही म्हणणाऱ्या kangana Ranaut च्या कारला तीनवेळा अपघात title=

मुंबई : अभिनेत्री कंगणा रानौत कायम तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर कंगनाचं समर्थन करणारा एक वर्ग आहे, तर दुसरीकडे तिच्यावर टीका करणाऱ्यांची संख्या देखील काही कमी नाही.  अशात कंगनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कंगना तिच्या ड्रायव्हिंग शौलीबद्दल सांगताना दिसत आहे. नुकताचं कंगनाने मर्सिडीज-मेबॅच एस-क्लास ही लक्झरी कार खरेदी केली आहे. ज्याची किंमत 3.2 कोटींपासून सुरू होते. याआधीही तिने अनेक आलिशान कार आपल्या घरी आणल्या आहेत.

याच दरम्यान, कंगनाचा एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती तिच्या ड्रायव्हिंग कौशल्याबद्दल बोलताना दिसत आहे. कंगना सध्या  'धाकड' सिनेमाचं प्रमोशन करताना दिसत आहे. एका मुलाखतीत रंगलेल्या रॅपिड फायर राऊंड  दरम्यान तिने अनेक गोष्टींचा पर्दाफाश केला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मुलाखतीत जेव्हा कंगनाला विचारण्यात आले की,  तिला ड्रायव्हिंग माहित आहे का, तेव्हा ती हसली आणि म्हणाली की, 'माझ्या लायसन्स दरम्यान मी तीनवेळा अपघात केला आणि मला ड्रायव्हिंग येत नाही... ', असं कंगनाने मुलाखती दरम्यान सांगितलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या कंगनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यानंतर कंगनाच्या 'धाकड' सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमा बॉक्स ऑफिसवर फरशी कमाल दाखऊ शकला नाही. कंगनाचा 'धाकड' सिनेमा फ्लॉप गेला आहे.