वरूणचं 'हे' गुपित कपिल शर्माने आणलं समोर

काय म्हणाला कपिल...  

Updated: Jan 2, 2021, 09:55 AM IST
वरूणचं 'हे' गुपित कपिल शर्माने आणलं समोर  title=

मुंबई : कॉमेडी सम्राट कपिल शर्मा कायम त्याच्या शोच्या माध्यमातून कलाकारांबद्दल नव-नवीन खुलासे करत असतो. नुकताच 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show)मध्ये वरुण धवन (Varun Dhawan) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) पोहोचले होते. दोघे देखील त्याच्या 'कुली नं १' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये पोहोचले होते. या भागात सर्वांनी प्रचंड मस्ती केली. मात्र हा भाग शोमधून वगळण्यात आला. मात्र याचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

शोमध्ये वरून आणि साराने फार मस्ती केली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कपिल वरूणबद्दल मोठा खुलासा करताना दिसत आहे. युट्यूबवर हा व्हिडिओ ट्रेंड करत आहे. व्हिडिओ पाहून तुम्ही देखील वरूणचं गुपित जाणून घेवू शकता. 

वरूणच्या गुपित रहस्याचा खुलासा करताना कपिल म्हणाला, वरुणने बरीच घरे भाड्याने दिली आहेत. यावर वरूण म्हणाला.. शक्ती कपूर असं जास्त करतात. वरूणच्या बाबतीत ही गोष्ट माहित पडल्यानंतर सारा मात्र अश्चर्य चकित झाली.