एक,दो,तीन.. गाण्यावर करिना कपूरच्या दिलखेचक अदा ....

1988 साली आलेल्या 'तेजाब' या चित्रपटातील '1.2.3...' गाणं आजही सुपरहीट आहे. 

Updated: Mar 22, 2018, 06:17 PM IST
एक,दो,तीन.. गाण्यावर करिना कपूरच्या दिलखेचक अदा ....   title=

मुंबई : 1988 साली आलेल्या 'तेजाब' या चित्रपटातील '1.2.3...' गाणं आजही सुपरहीट आहे. माधुरी दीक्षित आणि 1,2,3... या गाण्याचं समीकरण इतकं पक्क आहे की नव्या स्वरूपात आलेल्या या गाण्याला प्रेक्षकांनी फारसा प्रतिसाद दिलेला नाही.  

बागी 2 मध्ये नव्या स्वरूपातील गाणं  

बागी 2 या आगामी चित्रपटामध्ये '1,2,3..' हे गाणं पुन्हा नव्या स्वरूपात आलं आहे. या गाण्यावर अभिनेत्री जॅंकलीन फर्नांडिस थिरकली आहे. युट्युबवर हे गाणं ट्रेन्ड झालं तरीही ट्विटरवर मात्र या गाण्याला, जॅंकलिनला ट्रोल करण्यात आलं आहे.  

 

करिना कपूरचा व्हिडिओ  

करिना कपूरचा 'हलकट जवानी' गाण्यावरील करिना कपूरचा व्हिडिओ '1,2,3...' या गाण्यावर सेट केलेला एडिटेड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. करिना या गाण्यावर थिरकलेली नाही मात्र व्हिडिओ अशाप्रकारे एडिट करण्यात आला आहे की एखाद्याला करिना खरंच या गाण्यावर थिरकलेल्यासारख वाटतं. 

 

सलमान खानने केलं कौतुक  

माधुरी दीक्षितचे नृत्यदिग्दर्शन सरोज खान यांनी केले आहे. माधुरीच्या बहारदार नृत्याने सजलेल्या या गाण्याची बागी २ मध्ये वाट लागली आहे, असे दिग्दर्शक एन. चंद्रा यांचे म्हणणे आहे. मात्र जॅकलिनच्या या गाण्यावरून उठलेल्या वादावर तिचा को-स्टार सलमान खानने तिची बाजू घेतली आहे. सलमानने बुधवारी जॅकलिनचे हे गाणे शेअर करत तिचे कौतुक केले.एक दो तीन... गाण्यावर भडकले तेजाबचे दिग्दर्शक ; सलमानने घेतली बाजू

30 मार्चला रीलीज होणार चित्रपट 

माधुरी दीक्षितच्या गाण्याला सरोज खानने कोरिओग्राफ केले होतं तर अल्का याज्ञिकने गायलं होतं. जॅकलीनच्या रिक्रेटेड व्हर्जनला गणेश आचार्याची कोरिओग्राफी आहे तर श्रेया घोषालचा आवाज आहे. 'बागी 2'  चित्रपट 30 मार्चला रीलीज होणार असून साजिद नाडियाडवालाचे दिग्दर्शन आहे.