KBC दरम्यान अमिताभ बच्चन यांना गंभीर आजार

असा कोणता आजार 

KBC दरम्यान अमिताभ बच्चन यांना गंभीर आजार  title=

मुंबई : कौन बनेगा करोडपती सिझन 10 संपत असल्यामुळे अमिताभ बच्चन यांचे चाहते नाराज झाले आहेत. अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी केबीसीचा प्रवास संपत असल्याची खंत व्यक्त केली आहे. असं असताना एक नवा खुलासा झाला आहे. 

केबीसी 10 व्या सिझनमध्ये बुधवारी अहमदाबादमधून आलेली काजल पटेल फास्टेस्ट फिंगर फर्स्टमध्ये सगळ्यात लवकर उत्तर देऊन हॉट सीटवर पोहोचली. काजल या मुलीला प्रेमाने लोकं 'काजू' बोलतात कारण तिला काजू खायला अतिशय आवडतात. 

ज्यावर अमिताभ बच्चन यांना देखील काजू देखील पसंत असल्याचं सांगितलं.  पण याच काजूमुळे त्यांना एका गंभीर आजाराला सामोरे जावं लागलं आहे. ज्याचा त्रास आजही बिग बी विसरलेले नाहीत. आपल्या आवडीचा पदार्थ आपल्याला त्रास कसा देऊ शकते असा प्रश्न त्यांना पडला. 

2000 मध्ये जेव्हा केबीसी सुरू झालं तेव्हा माझ्या पाठीत प्रचंड दुखत होतं. मला असं वाटलं होतं की, मी खुर्चीत देखील बसू शकणार नाही. त्यानंतर मी काही तपासण्या केल्यावर माझ्या लक्षात आलं की, माझ्या पाठीच्या हड्डीत टीबी झाला आहे. बिग बी यांनी या आजारावर उपचार घेऊन अनेक औषध खाल्ली.  आता ते व्यवस्थित होऊन तुमच्यासमोर बसलो आहे. सगळ्यांनी योग्य वेळी आपल्या तब्बेतीची काळजी घ्यायला हवी, असा संदेश अमिताभ बच्चन यांनी दिला