lata mangeshkar funeral : शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार....लतादीदी अनंतात विलिन

भारताचा सूर हरपला... अनंतात विलिन झाला...

Updated: Feb 6, 2022, 08:59 PM IST
lata mangeshkar funeral : शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार....लतादीदी अनंतात विलिन title=

मुंबई : भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. त्या 93 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली. मागच्या 29 दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान लतादीदींनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 

सायंकाळी मुंबईतील शिवाजी पार्क इथे लतादीदींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी राजकीय नेत्यांपासून कलाविश्वातील अनेक दिग्गज उपस्थित होते. 

लतादीदींच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे परिवार देखील शिवाजी पार्कवर उपस्थित होता. राज्यपाल भगतसिंग कोशारी शिवाजी पार्क इथे उपस्थित होते. 

तसेच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मंत्री  छगन भुजबळ, खासदार सुप्रीया सुळे, पियुष गोयल, शाहरूख खान,  दिग्दर्शक मधुर भंडारकर, जावेद अख्तर, आशुतोष गोवारीकर, अनुराधा पौडवाल, माजी स्टार क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर उपस्थित होते. 

लतादीदी जरी अनंतात विलिन झाल्या असल्या तरी सूरांच्या माध्यमातून त्या कायम आपल्यात राहणार आहेत. त्यांची गाणी आजही अजरामर आहेत. त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून त्या कायम आपल्या स्मरणात राहातील. दीदीच्या निधनानंतर एका पर्वाचा अंत झाला.

लतादीदी यांचं निधन, पाहा लता मंगेशकर यांच्याशी संबंधित बातम्या

प्रेमात पडूनही लतादीदींना शेवटपर्यंत अविवाहित राहण्याचा निर्णय का घेतला?

हँड्स अप! जेव्हा Lata Mangeshkar यांनी CID च्या एसीपी प्रद्युम्नच्या डोक्यावरच धरली रिव्हॉल्वर

लतादीदींचे हे फोटो तुम्ही कधी पाहिले नसतील

Lata Mangeshkar Death : हेमा ते लता मंगेशकर कसा होता दीदींचा रंजक प्रवास?

जेव्हा Lata Mangeshkar यांना मिळालेलं दुसरं आयुष्य; तीन महिने कंठातून नव्हता दाटला सूर, पाहा असं काय झालेलं

कोण होता तो मुलगा? त्याच्या निधनाची बातमी ऐकून लता दीदींना बसला होता धक्का

लता दीदींच्या निधनाने बॉलिवूड हळहळलं, ट्विट करत वाहिली श्रद्धांजली

lata Mangeshkar Death : लतादीदी निधनानंतर मागे ठेवून गेल्या कोट्यवधींची संपत्ती

आई होऊन दीदी गायल्या आणि... पुन्हा सारा देश रडला... पाहा आठ तास उभं राहून त्यांनी कोणतं गाणं गायलेलं?

lata Mangeshkar Death : 'त्या' व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या लतादीदी, कधी ऐकलीये त्यांची 'अधुरी कहाणी...',

'कम्बख्त कभी बेसुरी ही नहीं हुई', दीदींबद्दल असं कोण बोललं ज्यामुळं माजलेली खळबळ?

एका निर्णयामुळे लतादीदी-आशाताईमध्ये आलेला दुरावा; कारण बरीच वर्षे होतं गुलदस्त्यात

Lata Mangeshkar Awards List: भारतरत्न लता मंगेशकर यांची 7 दशकातील पुरस्कारांची सुवर्ण कमाई

Best Of Lata Mangeshkar : तुमच्या प्ले-लिस्टचा भाग असलीच पाहिजेत अशी लतादीदींची 10 सुपरहिट गाणी

वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी लता दीदींनी 8 चित्रपटांमध्ये केले होते काम

lata Mangeshkar Death : लता मंगेशकर यांच्यावर झाला होता विषप्रयोग

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा, सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर