भाऊ कदमची पहिली वेब सिरीज 'Liftman'

पाहा भाऊचा हा व्हिडिओ 

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राला खळखळवून हसवणारा झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम. या कार्यक्रमातील कलाकार भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे यासारखे अनेक कलाकार घराघरात पोहोचले. भाऊ कदम यामधील लोकप्रिय कलाकार आहे. आपल्या अभिनयाने आणि आवाजाने भाऊ कदम सगळ्यांनाच भुरळ घालतो. आता हाच आपला भाऊ कदम वेब सिरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. 

भाऊ कदम 'लिफ्टमॅन' या वेबसिरीजमध्ये लिफ्टमॅनची भूमिका साकारत आहे. ऑफिसमध्ये लिफ्टमॅन हा अगदी महत्वाचा माणूस असतो. आणि ही व्यक्ती कशाप्रकारे सेवा पुरवत असते. हे आपण रोज अनुभवतो. पण रोजच्या या दिनक्रमात काही गंमती जमती होत असतात. हीच मज्जा भाऊ कदम आपल्या अभिनयातून साकारत आहे. तसेच या वेब सिरीजमध्ये पहिल्यांदाच आपल्याला पॉला देखील भेटणार आहे. कास्टिंग काऊच विथ अमेय अॅण्ड निपुण या वेब सिरीजमध्ये पॉला क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम पाहते. 

भाऊ कदमची लिफ्टमॅन ही वेब सिरीज 26 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. ही वेब सिरीज झी 5 मध्ये पाहायला मिळणार आहे.