सेम टू सेम माधुरी! धक धक गर्लच्या डुप्लिकेटचा Video पाहून चाहत्यांना बसला धक्का

Madhuri Dixit Duplicate Video: बॉलिवूड सेलिब्रेटींचे अनेक डुबलिकेट्स असतात. सध्या माधुरी दीक्षितच्या (Madhuri Dixit) डुप्लिकेटनं इंटरनेटवर अक्षरक्ष: धुमाकूळ (Duplicate News) घातला आहे. सध्या त्यांचा असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: May 21, 2023, 05:30 PM IST
सेम टू सेम माधुरी! धक धक गर्लच्या डुप्लिकेटचा Video पाहून चाहत्यांना बसला धक्का  title=

Madhuri Dixit Duplicate Video: माधुरीचे जगभरात अनेक फॅन्स आहेत. माधुरीचं नावं घेतलं की आपल्या डोळ्यासमोर तिचे अनेक डान्स परफॉर्मन्स येतात. परंतु तिचा सगळ्यात लक्षात राहिलेला डान्स परफॉर्मन्स म्हणजे 'हमको आजकल हैं इंतजार' या गाण्यातला. माधुरी ही उत्कृष्ट डान्सर (Madhuri Dixit Songs) आहे आणि त्याचबरोबर चांगली अभिनेत्रीही आहे. माधुरीचा चाहतावर्गही खूप आहे सोबतच तिला कॉपी करणारेही अनेक तिचे चाहते आहेत. त्याऊलट सध्या तिच्याप्रमाणे दिसणारेही कलाकार तुम्हाला पाहायला मिळतील. सध्या अशीच एक युट्युबर आहे जिनं इन्टाग्रामवर पुर्णत: धुमाकूळ घातला आहे. ती सेम टू सेम माधुरी प्रमाणे दिसत असली तरी तिला नेटकऱ्यांनी मात्र ट्रोल केले आहे. यावेळी त्यांनी कमेंट्समध्ये तू माधुरीसारखी दिसत नाहीस असं म्हटलंय. 

बॉलिवूड हे असं विश्व आहे ज्यातील कलाकारांचे फॅन्स हे फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत. या बॉलिवूड कलाकारांचे अनेक फॅन्सही असतात. त्याचसोबत त्यांच्यासारखे हुबेहुब दिसणारे अनेक कलाकारही आहेत. जे अगदी हुबेहुब त्यांच्यासारखी मिमिक्री करतात. शाहरूख खान, अमिताभ बच्चन, गोविंदा अशा लोकप्रिय कलाकारांचे डुप्लिकेट कलाकार (Bollwyood Celebrities Duplicate Artist) तुम्ही पाहिलेच असतील. सध्या अशाच एका माधुरीच्या फॅनची आणि डुप्लिकेट सोशल मीडियावर चर्चा आहे. ज्या एका युट्युबर आहेत. त्या इन्टाग्रामवरही खूप सक्रिय. असतात. त्यांचे फॉलोवर्सही खूप आहेत. त्यांचे नाव आहे मधू शर्मा. 

हेही वाचा - 'ये रिश्ता क्या कहलाता हैं' फेम 'ही' अभिनेत्री मालदीवमध्ये फिरतेय खास व्यक्तीसोबत?

सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. माधुरीच्या 'हमको आजकल हैं इंतजार' या गाण्यावर त्यांनी एक व्हिडीओ तयार केला आहे. यावेळी मधू यांनी अगदी हुबेहुब माधुरीसारखे एक्सप्रेशन दिले आहेत. त्याचप्रमाणे त्याच गाण्यातील लुकप्रमाणे त्यांनी लुक केला आहे. परंतु त्यांच्या या व्हिडीओखाली मात्र त्यांना (Madhuri Dixit Duplicate) नानातऱ्हेच्या कमेंट्स आल्या आहेत. अनेकांनी तुम्ही माधुरी दीक्षित प्रमाणे दिसत नाही असं म्हटलंय. तर एकानं थेट माधुरीच्या पतीचा उल्लेख केला आहे आणि म्हटलं आहे की नेने यांनी ओळखलं तर आम्ही मानू. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तर काहींनी तुम्ही अगदी माधुरीसारख्याच दिसत असंच म्हटलेलं आहे. या व्हिडीओखाली अनेक कमेंट्स आल्या असून यावेळी त्यांच्या या व्हिडीओला चांगले लाईक्सही आले आहेत. मधु शर्मा या माधुरीच्या चित्रपटांच्या गाण्याचे आणि त्यातला इमोशनल, ड्रामॅटिक सीन्सचे रील्स करताना दिसतात. त्यांच्या या व्हिडीओला अनेक लाईक्स आणि कमेंट्सही येताना दिसतात. सध्या या व्हिडीओनंही त्यांच्या चाहत्यांना भुरळ घातली आहे.