'ये रिश्ता क्या कहलाता हैं' फेम 'ही' अभिनेत्री मालदीवमध्ये फिरतेय खास व्यक्तीसोबत?

Shivangi Joshi Maldives Vacation: 'ये रिश्ता क्या केहेलाता हैं' ही मालिका अत्यंत लोकप्रिय आहे. यावेळी या मालिकेतील अभिनेत्री शिवांगी जोशी ही मालदीवमध्ये वेकेशन एन्जॉय करताना दिसते आहे. त्यामुळे सध्या तिचे हे वेकेशन फोटो सोशल  मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. मालदीवच्या बीचवर ती आपला 'मी टाईम' (Maldives Beach) एन्जॉय करते आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: May 21, 2023, 04:33 PM IST
'ये रिश्ता क्या कहलाता हैं' फेम 'ही' अभिनेत्री मालदीवमध्ये फिरतेय खास व्यक्तीसोबत? title=
(Photo : Shivangi Joshi | Instagram)

Shivangi Joshi Maldives Vacation: सध्या बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री हे आपल्या आगाळ्या वेगळ्या स्टाईलसाठी आणि अभिनयासाठी (yeh Rishta Kya Kehlata Hai) ओळखले जातात. त्याचसोबतचं ते आपल्या वैयक्तिक आयुष्यात काय काय करतात आणि कुठे कुठे फिरायला जातात याबद्दलही त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता असते. याबद्दल ते आपल्या चाहत्यांना इन्टाग्रामवरून अपडेट करताना दिसतात. मालदीव हे अनेक सेलिब्रेटींचे लोकप्रिय फिरण्याचे ठिकाणं आहे. अक्षय कुमार, करीना कपूर खान अन्य सेलिब्रेटीही मध्यंतरी मालदीवची (Bollywood Celebrities at Maldives) मस्त सुट्टी करून आले आहेत. आता अशीच एक लोकप्रिय अभिनेत्री मालदीवला जाऊन आली आहे. सध्या तिनं आपले हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

शिवांगी जोशीचे इन्टाग्रामवर प्रचंड फॉलोवर्स आहेत. तिनं सध्या आपले मालदीवचे फोटो इन्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना सोशल मीडियावर तूफान लाईक्स आले आहेत. यावेळी ती वेगळ्या लुकमध्ये दिसते आहे. तिनं यावेळी समर सिझनचा लुक कॅरी केला आहे. या फोटोंमध्ये ती मालदीवच्या बीचवर दिसते आहे. तिनं मस्त समरवेअरचा गाऊन घातला आहे. यावेळी ती खूप स्टाईलिशही (Bollywood Celebs at Summer Vacation) वाटते आहे. शिवांगीनं या लुकमधला तिचा एका फोटो शेअर केला आहे ज्यात तिनं कॅप्शन लिहिलं आहे की, 'स्विट आणि स्लॉटी.' तिच्या या फोटोवर अनेकांच्या कमेंट्सही येताना दिसत आहेत. यामध्ये ती मालदीवच्या बिचवर एका झोपाळ्यावर बसलेली दिसते आहे. 

हेही वाचा - 'आदिपुरूष'मधील देवदत्त नागेचं 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीशीही आहे खास नातं

या फोटोंमध्ये ती आपला मी टाईम एन्जॉय करताना दिसते आहे. यावेळी तिनं या ड्रेसमध्ये आपले परफेक्ट टॉण्ड बॅक फॉन्ट केली आहे. तिनं केस मोकले सोडले आहेत आणि लाईट मेकअप केला आहे. तिच्या या फोटोंची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. यावेळी तिच्या चाहत्यांनी या फोटोंखाली प्रचंड लाईक्स केले आहेत. तिच्या या लुकचे सगळेच चाहते झाले आहेत. अनेकांनी तिला परी, अप्सरा अशा वेगवेगळ्या उपमा दिल्या आहेत. त्यामुळे तिच्या या फोटोंची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'ये रिश्ता क्या केहेलाता हैं' या मालिकेतून शिवांगीला प्रचंड प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती. आजही तिला तिच्या या मालिकेतील भुमिकेसाठी ओळखले जाते. तिनं याशिवाय अनेक विविध मालिकांतून कामं केली आहेत. यावेळी ती एका खास व्यक्तीसोबत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. परंतु यावेळी तरी ती एकटीच या फोटोंमध्ये फिरताना दिसते आहे. तिनं वेगवेगळ्या पोझेझमध्ये हे फोटोशूट केले आहे.