माधुरीच्या बकेट लिस्टमधील पहिले गाणे प्रदर्शित

बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या बहुप्रतिक्षित बकेट लिस्ट या मराठी सिनेमातील पहिले गाणे प्रदर्शित झालेय. 

Updated: May 9, 2018, 05:12 PM IST
माधुरीच्या बकेट लिस्टमधील पहिले गाणे प्रदर्शित title=

मुंबई : बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या बहुप्रतिक्षित बकेट लिस्ट या मराठी सिनेमातील पहिले गाणे प्रदर्शित झालेय. या गाण्यात माधुरीच्या चाहत्यांना तिचा डान्सही पाहायला मिळणार आहे. होऊन जाऊ द्या असे या गाण्याचे बोल आहेत. गेली अनेक वर्षे बॉलीवूडमध्ये दमदार कामगिरी करणारी मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या पहिल्यावहिल्या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. मराठमोळी असूनही माधुरीने मराठी चित्रपटात काम का केले नाही, याबाबत माधुरीच्या चाहत्यांसोबत अनेकांना उत्सुकता होती. पण, आता ही उत्सुकता संपली असून, माधुरी 'बकेट लिस्ट' या चित्रपटातून मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच 'बकेट लिस्ट'चा ट्रेलर प्रदर्शित झाला.

बकेट लिस्टच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिलीये. त्यामुळे चित्रपटात नेमकं काय बघायला मिळणार आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. दरम्यान, 'बकेट लिस्ट' हा आपल्या आस्तित्वाचा शोध घेणाऱ्या एका सामान्य, मध्यमवर्गीय गृहिणीची कहाणी असल्याचे सांगितले जात आहे. मध्यवमर्गीय स्त्रीची कहणी सांगणारे तसे बरेचसे चित्रपट मराठीत आले आहेत. पण, आपल्या पहिल्यावहिल्या मराठी चित्रपटातून माधुरी काय देणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

आतापर्यंतच्या फिल्मी करीअरमध्ये कधीच बाईक न चालवलेली माधुरी बकेट लिस्टच्या निमित्ताने पहिल्यांदाच सुपर बाईकवर दिसली आहे. आपल्या आयुष्याच्या एका वळणावर ही गृहिणी थेट बाईकवर स्वार होते...यामागे नेमकं काय गोम आहे, हे चित्रपट पाहिल्यावर आपल्याला कळणारच आहे. पुण्याच्या साने कुटुंबातील गृहिणीच्या भूमिकेत माधुरी आपल्याला दिसणार असून एकाचवेळी बऱ्याच भूमिका सक्षमपणे पार पाडणाऱ्या गृहिणींचं प्रतिनिधित्त्व ही हास्यवदना करते आहे. आपल्या या भूमिकेसाठी पुणेकरांचा हजरजबाबीपणा आणि टोमणेदार विनोदी बोलणं आपण आत्मसात केल्याचंही तिने म्हटलं आहे